Whatsapp Status फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीलाच दाखवा, 'अशी' करा सेटिंग, पाहा सोपी ट्रिक

Whatsapp Status हे अनेकांसाठी खूप महत्त्वाचे असते. आपल्या मनातील भावना इतरापर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच सोपा मार्ग आहे. आपण काय करतोय, काय करणार आहोत, आपले सध्याचे स्टेट्स दाखवण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेट्सचा सर्रास वापर केला जातो.

Whatsapp ने वेळोवेळी आपले अनेक फीचर्स मध्ये बदल केला आहे. या कारणामुळे जगभरात व्हॉट्सअॅप यू+जर्सची संख्या लागोपाठ वाढत आहे. कंपनी यूजर्सच्या प्रायव्हसीची खास काळजी घेते.

आता व्हॉट्सअॅप एक नवी फीचर घेऊन आली आहे. यात तुम्ही ज्याला तुमचे स्टेट्स दाखवायचे नाही, त्यांना तुम्ही लपवू (Hide) शकता. त्यामुळे तुमचे स्टेट्स कुणी पाहायला हवे, हे ठरवण्याचा अधिकार आता तुम्हाला मिळणार आहे.

आधी आपण व्हॉट्सअॅपल स्टेट्स ठेवले की, ज्यांच्याकडे आपला मोबाइल नंबर आहे. त्यांना ते स्टेट्स दिसत असत. परंतु, आता तसे होणार नाही. ज्या व्यक्तीला स्टेट्स दाखवायचे आहे. त्यांनाच तुमचे स्टेट्स दिसू शकते.

स्टेट्स मध्ये गेल्यानंतर My Contacts, My Contacts Except आणि Only Share With चे ऑप्शन दिसेल. जर तुम्ही कोणत्याही स्पेशल किंवा निवडक व्यक्तीला हाइड करायचे असेल तर तुम्ही My Contacts Except वर क्लिक करावे लागेल. यात पुन्हा contacts ला हे स्टेट्स दिसणार नाहीत. ज्यांना तुम्हाला तुमचे स्टेट्स दाखवायचे नाही.

जर कोणत्याही स्पेशल व्यक्तीसाठी स्टेट्स ठेवत असाल तर तुमच्याकडे Only Share With हे ऑप्शन दिसेल.

जर कोणत्याही स्पेशल व्यक्तीसाठी स्टेट्स ठेवत असाल तर तुमच्याकडे Only Share With हे ऑप्शन दिसेल.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन होईल. या ठिकाणी ज्या व्यक्तीचा नंबर तुम्ही निवड कराल त्याच व्यक्तीला तुमचे स्टेट्स दिसेल.

याशिवाय, कोणत्याही व्यक्तीला तुमचे स्टेट्स दिसणार नाही. My Contacts चा अर्थ तुमचे स्टेट्स सर्व कॉन्टॅक्ट्सना दिसू शकेल. Android Users साठी हेच ऑप्शन दिले जाते. जर कोणी Android User Hide करणार असेल तर त्याला App मध्ये जावून सर्वात वरच्या तीन डॉट्स वर जावे लागेल. यात तुम्हाला सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी मध्ये जावून सेटिंग करावी लागेल