वेब होस्टिंग म्हणजे काय? What Is Web Hosting Information In Marathi
अनेकदा आपण पाहतो की आपली वेबसाईट अचानक काम करायचं बंद करते,कधी कधी त्यात error येतो. तुमच्या सोबत पण असच झाले आहे का ?
नेमक अस का होत असेल ? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रानो जितकी चांगली तुमची web hosting तितक तुमची वेबसाईट, यूजर ला लवकर प्रतिसाद देईल.
काही वेळेस तर ट्रॅफिक एवढी भर भरून येते की तुमची वेब hosting तो लोड सहन करू शकत नाही, परिणामी वेबसाईट स्पीड कमी होऊन ती उघडत नाही आणि error दाखवते.
तर आज आपण वेब होस्टिंग म्हणजे काय ? वेब होस्टिंग चे प्रकार नेमकी कोणते ? हे या लेखा मधे पाहणार आहोत.
Also Read:
मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग अशा याप्रकारे करा सुरु|Marathi typing in Marathi
VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.
नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.
Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?
आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?
मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.
वेब होस्टिंग म्हणजे काय ?
वेब होस्टिंग म्हणजे एक प्रकारची ऑनलाईन सेवा जी की एखाद्या कंपनी अथवा प्रायव्हेट व्यक्तीला सवतहाचे संकेतस्थळ अथवा वेब पेज इंटरनेट वर लोकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध करून देते, याला वेब होस्टिंग असे म्हणतात.
तुम्हाला प्रश्न पडला असेल जसे मेमोरी मधे गाणे, पिक्चर स्टोअर केले जातात तसे वेबसाईट कुठे स्टोअर केली जात असेल बर ?
तर मित्रानो वेबसाईट ही खास कॉम्प्युटर वर स्टोअर केली जाते त्याला सर्व्हर असे म्हणतात.
तुम्ही बँकेत गेल्यावर कधी कधी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काम थांबल आहे अस सांगण्यात येत. सर्व्हर डाऊन होन म्हणजे वेब होस्टिंग मधे काहीतरी गडबड होणे.
वेब होस्टिंग काम कस करत ?

सर्व प्रथम मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो, तुम्हाला एखाद्याला स्पीड पोस्ट पाठवायचे असेल तर समोरच्याचा ॲड्रेस माहीत असेल तरच ते पोस्ट योग्य जागी जाईल अन्यथा ते जाणार नाही.
वेबसाईट साठी पण एक अड्रेस असतो त्याला आपण डोमेन म्हणतोत.
उदाहरण : www.Facebook.com हे एक डोमेन आहे,आपण हे वेब ब्राऊझर वर टाईप केल्यास आपल्याला ही वेबसाईट ओपन होते.
आपल्याकडील असलेले फोटो, माहिती, डाटा हे सर्व वेब होस्टिंग वर सेव केलं जातं.
वेब होस्टिंग कंपनी काय काय सुविधा देतात ?
वेब होस्टिंग विकत घेताना काही कंपनी पुढील सेवा पुरवतात.
- २४ तास कस्टमर सर्व्हिस मोफत
*ऑटोमॅटिक वेबसाईट च बॅकअप
*SSL सर्टिफिकेट
*ईमेल होस्टिंग
आम्ही आमच्या Humbaa.com वर clodways ची होस्टिंग वापरत आहोत. Cloudways hosting ही जवळ पास आम्ही 2 वर्षांपासून वापरात आहोत.
Cloudways hosting बाबत जर सांगायचे झाले तर, आपली wordpress वेबसाईट ही क्लाऊड वर होस्ट केली जाते . क्लाऊड वर जर आपण वेबसाईट होस्ट केली, तर आपली वेबसाईट केंव्हाच डाउन, म्हणजेच बंद पडत नाही.
उ.दा – xyz वेबसाईट आहे, जर त्यावर अचानक 1 लाख लोक भेट द्यायला आले, तर ती website “पटकन उघडणार नाही” आणि तुमचा ग्राहक, तुमच्या compititor च्या वेबसाईटवर भेट देईल.
यामुळे तुमचा business 24*7 चालावा असे जर वाटत असेल, तर आपण बिनधास्तपणे Cloudways Hositng चा विचार अवश्य करावा.

Cloudways Hosting चा सर्वात मोठा फायदा हा आहे की, ते आपल्याला 24*7 मदत करण्यासाठी तत्पर असतात.
माझा स्वानुभव आहे, मी रात्री 2 वाजता जरी सपोर्ट मागितला तरी, cloudways hosting मला मदत करते.
आपण एकदा तरी Cloudways Hosting चा विचार करावा.
वेब होस्टिंग चे प्रकार कोणते ?
बऱ्याच कंपन्या त्यांच्या कस्टमर च्या गरजेनुसार लागणाऱ्या वेब होस्टिंग सेवा पुरवतात.
जसे की काहीना बिझनेस वेबसाईट
तयार करायची असते, काहीजण सवतहाचा पर्सनल ब्लॉग बनवतात.
अश्या प्रकारे लोकांच्या गरजेनुसार ह्या कंपन्या त्या त्या वेब होस्टिंग सेवा पुरवतात. चला तर मग पाहू आपण वेब होस्टिंग चे प्रकार कोणते आहेत तर.
१) क्लाउड वेब होस्टिंग :
मित्रानो सध्या च्या ब्लॉगिंग मधे किंवा बिझनेस मधे जास्त करून विश्वसनीय वेब होस्टिंग कोणती असेल तर ती म्हणजे क्लाउड वेब विश्व.
यामधे तुमचं सर्व्हर किती पण ट्रॅफिक आली अथवा बिघाड झाला तर सर्व्हर डाऊन होत नाही.
त्यामुळे तुमच्या ब्लॉगिंग वेबसाईट साठी ट्रॅफिक खूप येत असेल तर नक्कीच माझा सल्ला हीच वेब होस्टिंग तूम्ही घ्यावी असा असेल.
२) शेअर्ड वेब होस्टिंग :
यामधे तुम्ही वेब होस्टिंग एका जागेवरून दुसऱ्या जागीच्या कस्टमर ला तुम्ही सर्व्हर शेअर करू शकतात.
या सर्व्हर मधील मेमोरी, रिसोर्स बाकी स्पेस शेअर करू शकतात. नावा मधेच शेअर असल्यामुळे हिला शेअर्ड वेब होस्टिंग असे म्हणतात.
हिची किंमत सुद्धा कमी आहे त्यामुळे जे लहान व्यवसायिक आहेत त्यांना कमी पैसे मधे याचा प्रार्थमिक स्तरावर उपयोग होईल.
३) Dedicated वेब होस्टिंग :
या वेब होस्टिंग मधे सवताहाच्या वेबसाईट साठी स्वतंत्र अस वेब होस्टिंग सर्व्हर कंपनी कडून पुरवलं जातं. यामधे तुम्ही वेबसाईट हवी तशी या सर्व्हर वर वापरू शकतात आणि त्यात हवे तसे बदल करू शकतात .
Dedicated वेब होस्टिंग ची किंमत सुद्धा महाग आहे. जर तुमचा व्यवसाय अगदी मोठा असेल तर तुम्ही नक्कीच ही वेब होस्टिंग वेबसाईट साठी वापरायला हवी.