Pune: साई, पीएनबीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम

[ad_1]

एमपीसी न्यूज -भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), (Pune)पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संघांनी (कॅग) अनुक्रमे केंद्रीय सचिवालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) संघांवर विजय मिळवताना हॉकी महाराष्ट्र आयोजित मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सोमवारी चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीसी) पाठिंब्याने मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सोमवारी क गटात, फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) आणि सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी राहिली. प्रत्येकी एका गुणामुळे 3 सामन्यांतून 4 गुणांसह दोन्ही संघांनी आपल्या गटात अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले. परमवीर सिंगने (22वे – पीसी) एफसीआयला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी, हरमन सिंगने(7वे) सर्व्हिसेसचे खाते उघडले.

अ गटामध्ये, साईने सेंट्रल सेक्रेटरिएटविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून 3 सामन्यांतील गुणसंख्या 6 वर नेली आणि गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. साईकडून दोन्ही गोल आदित्य लालगेने (19वा, 49वा) केले. प्रतिस्पर्धी संघाकडून एकमेव गोल विनयने (चौथा) केला. सुरुवातीलाच पिछाडी पडूनही साईने खेळ उंचावत बाजी मारली.

अन्य सामन्यांत पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) सीआयएसएफचा 5-0 असा धुव्वा उडवत आणि भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाने (कॅग) केंद्रीय राखीव पोलीस दल संघाला (सीआरपीएफ) 4-2 असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीसाठीचे आव्हान कायम राखले आहे. पीएनबी अणि कॅग संघाने पहिल्या विजयासह 2 सामन्यानंतर गुणसंख्या 4 वर नेली.

पंजाब नॅशनल बँकेकडून गुरसिमरन सिंगने तीन (34वे – पीसी, 40वे – पीसी, 55वे – पीसी) तर नवीन अंटिल (41वे) आणि मथियास मिन्झने (43वे) प्रत्येकी एक गोल केला.

ड गटातील लढतींमध्ये, कॅगच्या विजयात झेस निलम संजीप (11वे – पीसी), चंदन सिंग (32वे – पीसी), अभ्रारन सुदेव बी (52वे) आणि परमोदची (56वे – पीसी) कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. सीआरपीएफकडून (समशेर 18वे-पीसी आणि राहुल शर्मा (24वा – पीसी) यांनाच गोल करता आले.

निकाल
क गट: सशस्त्र सीमा बल: 3 (अमन शर्मा 8वा – पीसी, 40वा – पीसी; शांतिकुमार शर्मा 57वा) विजयी वि. तामिळनाडू पोलीस: 3 (शनमुगवेल एस 37वा; मथन एम 47वा, 56वा). मध्यंतर: 1-0

क गट: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया: 1 (परमवीर सिंग 22वा – पीसी) सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड: 1 (हरमन सिंग 7वा). मध्यंतर: 1-0.

ड गट: भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक : 4(झेस निलम संजीप 11वे – पीसी; चंदन सिंग 32वे – पीसी, अभ्रारन सुदेव बी 52वे, परमोद 56वे – पीसी) विजयी वि. केंद्रीय राखीव पोलिस दल: 2 (समशेर 18 – पीएस; राहुल) शर्मा 24 वा – पीसी). मध्यंतर: 2-1

ड: पंजाब नॅशनल बँक: 5 (गुरसिमरन सिंग 34वे – पीसी; 40वे – पीएस, 55वे – पीसी; नवीन अंटिल 41वे; मथियास मिन्झ 43वे) विजयी वि. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स: 0. मध्यंतर: 0-0

अ गट: भारतीय क्रीडा प्राधिकरण: 2(आदित्य लालगे 19वा, 49वा) विजयी वि. केंद्रीय सचिवालय: 1 (विनय 4वा). मध्यंतर: 1-1

ब गट: कॅनरा बँक: 6 (सोमय्या कुपंदा 4वा, 18वा, 40वा; वर्गीस के. जॉन 24वा, 55वा; पी सुनील बेंजामिन 49वा) विजयी वि. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकॅडमी: 0. मध्यंतर: 3-0.

 

[ad_2]