Pune : साई, स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्ड उपांत्यपूर्व फेरीत

[ad_1]

एमपीसी न्यूज – भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि स्टील प्लांट्स स्पोर्ट्स (Pune)बोर्ड संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले.

हॉकी महाराष्ट्र आयोजित आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत करा किंवा मरा अशा स्वरूपाच्या लढतीत मंगळवारी साईने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचा (सीडीटी) 5-1 असा पराभव करून अ गटामध्ये 9 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघ अव्वल स्थानी आहे.

ललित नेगी (6वे), नीरज (28वे), पंकज (38वे – पीएस, 53वे – पीसी) आणि रजत मिंज (54वे) यांनी साईकडून गोल केले. सीडीटीकडून केवळ नचप्पा याला (44 व्या) गोल करता आला.

स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्ड संघाने ब गटात दुसरे स्थान मिळवले. गटातील शेवटच्या लढतीत देना बँकेने लेट गोलच्या जोरावर त्यांच्याविरुद्ध 3-3 अशी बरोबरी साधली. प्रधान सोमन्ना पुडियोक्काडा सोमय्याने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करताना देना बँकेला एक गुण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, चंदा अय्यान्ना निक्किन थिम्मय्या (चौथा) आणि सोमन्ना किमीने (33वा) गोल केले होते. स्टील प्लांट्स स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डकडून दिलबर बार्ला (5वे); बारा रबी (53वा) आणि अब्दुल कादिरने (55वा) गोल केले.

देना बँकेविरुद्धच्या बरोबरीनंतरही स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्डने 4 सामन्यांतून 7 गुणांसह गटात दुसर्‍या स्थानासह आगेकूच केली.

ब गटात उपांत्यपूर्व फेरीसाठी आधीच पात्र ठरलेल्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाला (आरएससीबी) ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाची संघाने (एआयपीएससीबी) चांगलेच झुंजवले. अटीतटीच्या लढतीत 2-3 अशा पिछाडीनंतर 4-3 असा विजय मिळवला. या विजयासह आरएसपीबीने ब गटातील अपराजित मालिका कायम ठेवली.

आरएसपीबीकडून परमप्रीत सिंग (चौथा-पीसी), युवराज वाल्मिकी (21वा), दर्शन विभव गावकर (54वा) आणि सिमरनजोत सिंगने (56वा) गोल केले. एआयपीएससीबी संघाकडून वरिंदर सिंगने (37वा-पीसी; 45वा) दोन आणि हॅरिस मोहम्मदने (11वी – पीसी) एक गोल केले.

निसटत्या पराभवामुळे एआयपीएससीबीच्या खात्यात 6 गुण जमा झाले आणि गटात तिसर्‍या स्थानी फेकले गेले. स्टील प्लांट्स प्रमोशन बोर्डाला (7 गुण) त्यांना मागे टाकताना बाद फेरी गाठली.

निकाल
अ गट: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी): 5 (गुरजिंदर सिंग 2रा – पीएस; शिलानंद लाक्रा 44वा; तलविंदर सिंग 48वा; सुमीत कुमार 55वा, 59वा) विजयी वि. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीटी) – सेंट्रल हॉकी टीम: 1 (विजय कुमार गोंड 37 वा). मध्यंतर: 1-1

Sangavi : गणेश मंडळासमोर आरतीच्यावेळी डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती

अ गट : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीडीटी): 1 (नचप्पा 44वा) पराभूत स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई): 5 (ललित नेगी 6वा; नीरज 28वा; पंकज 38वा – पीएस, 53वा – पीसी; रजत मिंझ 54वा). मध्यंतर:0-2

ब गट: ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एआयपीएससीबी): 3(हॅरिस मोहम्मद 11वा – पीसी; वरिंदर सिंग 37वा – पीसी; 45वा) पराभूत वि. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी): 4 (परमप्रीत सिंग 4वा – पीसी; युवराज वाल्मिकी 21 वा; दर्शन विभव गावकर 54 वा; सिमरनज्योत सिंग 56वा). मध्यंतर: 2-1

ब गट: स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड (एपीएसबी): 3(दिलबर बार्ला 5वा; बारा रबी 53वा; अब्दुल कादिर 55वा) बरोबरी वि. कॅनरा बँक: 3 (चंदंदा अय्यान्ना निक्किन थिम्मय्या 4वा; सोमन्ना किमी 33वा; प्रधान सोमन्ना पुडियोक्काडा सोमिया – 60वा-पीसी). मध्यंतर: 0-1

 

[ad_2]