Hinjawadi : हिंजवडी मध्ये 85 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक

[ad_1]

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये आपल्या फ्लॅटसमोर(Hinjawadi) चालत असणाऱ्या 85 वर्षीय महिलेवर एका 23 वर्षीय नराधमाने बलात्कार केला. वृद्धेला फ्लॅटसमोरून लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून या नराधमाने वृद्धेवर बलात्कार केला. हिंजवडी पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली.

हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील स्वत:च्या फ्लॅटसमोरील(Hinjawadi) जागेत सोमवारी (दि. 23) संध्याकाळी साडेसहा वाजता हा घृणास्पद प्रकार घडला. या प्रकरणी पिडीत वृद्धेच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी ओम जयचंद पुरी (वय 23, सध्या रा. साखरे वस्ती, मुळ रा. धाराशिव ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पिडीत वृद्ध महिला सोसायटीतील(Hinjawadi) पाचव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅट समोर चालत होती. सोसायटीतील एका ठिकाणी इलेक्ट्रीशियनचे काम करण्यासाठी आरोपी सोसायटीमध्ये आला होता.

तो पाचव्या मजल्यावर आला असता त्याने वृद्धेला पाहिले. तसेच मजल्यावर कोणीही नसल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर त्याने वृद्धेवर झडप घालत तीचे तोंड दाबले. त्यानंतर जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन वृद्धेवर बलात्कार केला. बलात्कार करताना वृद्धेचा गळा दाबला तसेच वृद्धेला हाताने मारहान केली. हा सर्व प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. हा प्रकार सुरू असताना वृद्धा प्रतिकार तसेच आरडाओरडा करत होती. त्यामुळे आरोपी पळून गेला.

दरम्यान, वृद्धेने हा प्रकार घरी जाऊन सांगितला. घरच्यांनी तातडीने हिंजवडी पोलीस (Hinjawadi) ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. चार दिवसांपूर्वी हा आरोपी सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर सोमवारी हा आरोपी पुन्हा सोसायटीत आला. त्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी सोसाटीत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्या अनुषंगाने आरोपीला अटक केली.

आरोपीला अटक केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता. आरोपीने हे कृत्य दारूच्या नशेत(Hinjawadi) केले. त्याला पॉर्न पाहण्याचीही सवय होती, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हिंजवडी पोलिासांनी तत्परतेने आरोपीला अटक करून मंगळवारी आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात (Hinjawadi) हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, “तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी एकिकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर दुसरीकडे आरोपीचा शोध सुरू केला.

काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान, सोसायटीमध्ये कामगार आल्यानंतर तो कोणाकडे कामासाठी जात आहे, किती वेळ सोसायटीमध्ये थांबत आहे, याची खातरजमा सुरक्षारक्षकांनी संबंधित फ्लॅट धारकांशी करणे गरजेचे (Hinjawadi) आहे.” 

ReplyForwardAdd reaction



[ad_2]