Skip to content

ACB Raid : वडगाव मावळ येथे 35 हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

  • 2 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज – तपासात मदत करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची (ACB Raid) मागणी करून 35 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक पोलीस अधिकारी व पोलीस शिपायाला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज (बुधवारी) सायंकाळी सातच्या सुमारास वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत करण्यात आली.

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील तुळशीदास मगर (वय 51) व पोलीस शिपाई सागर कैलास गाडेकर (वय 34) अशी याप्रकरणी (ACB Raid) अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Pune : मृत्यूनंतरही त्याचं हृदय धडधडतंय देशासाठी! प्रसाद गोसावी ठरले अवयवदान करणारे पहिले पत्रकार

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत (ACB Raid) माहिती दिली. तक्रारदार यांच्या मारामारीच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील मगर व पोलीस शिपाई सागर गाडेकर यांच्याकडे आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी मगर व गाडेकर यांनी तक्रारदाराकडे 50 हजार  रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 35 हजार रुपये लाचेची रक्कम ठरली. याबाबत पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात 29 ऑगस्टला तक्रार दाखल करण्यात आली.

त्यानुसार आज (बुधवारी) सायंकाळी सातच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उप अधीक्षक दयानंद गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तसेच किरण शेलार, कैलास महामुनकर, पूनम पवार , पांडुरंग माळी आदींच्या पथकाने ही (ACB Raid) कारवाई केली.

आरोपींना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]