Alandi : आळंदीमध्ये देखावे पाहण्यासाठी गर्दी


एमपीसी न्यूज –  आळंदीमध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक असे पौराणिक देखावे  ,आकर्षक विद्युत रोषणाई ,सजावट,मूर्ती देखावे , आकर्षक गणेश मूर्ती (Alandi) तर काही गणेश मंडळांनी गणेश उत्सवानिमित्त लहान मुलांच्या स्पर्धाचे आयोजन केले आहे.

IMG 20240910 201056

व्यापारी तरुण मंडळ ,श्री दत्तनगर प्रतिष्ठान ,धर्मराज गणपती मंडळ यांनी पौराणिक मंदिर सभागृह  व पौराणिक मंदिर  असे  देखावे सादर केले आहे. न्यु दत्तनगर मंडळाने आकर्षक महल देखावा तर शिवस्मृती प्रतिष्ठान मंडळाने सालाबादप्रमाणे भव्य लालबागच्या राजाची आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच जय गणेश ग्रुप यांनी आकर्षक गणेश मूर्तीसह पूर्वीचे खेडेगावातील जुनी घरे व घरांना कंदील ,जुना पार,तुळशीवृंदावन  (Alandi) असा देखावा सादर केला आहे.शिवतेज मंडळातर्फे रोज श्रींची महाआरती होत आहे . जय गणेश प्रतिष्ठान यांनी पडद्यांची आकर्षक कलाकृती सादर केली आहे.

IMG 20240910 194610

राजे ग्रुप यांनी गडसंवर्धन देखावा सादर केला आहे तर जय भवानी मित्र मंडळाचा श्रीकृष्ण वर आधारित असलेल्या देखाव्याचे काम अजून सुरू आहे. अमरदीप तरुण मंडळ,पद्मावती माता मित्र मंडळ,राजे शिछत्रपती मंडळ व आझाद तरुण मंडळाने गणेश उत्सवा निमित्त विद्युत  रोषणाई केली आहे. कै. बाबाशेठ मुंगसे पा.प्रतिष्ठान यांनी आकर्षक सजावट ,एकलव्य प्रतिष्ठान आकर्षक सजावट,हनुमान तरुण मंडळ आकर्षक फुल सजावट,सद्भावना ग्रुप आकर्षक सजावट व अखिल भाजी मंडई मंडळाने गणेश मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे.हजेरी मारुती मंदिरातील गणराया समोर हरिनामाचे कीर्तन भजन होत आहे.माऊली पार्क येथील गणेश मंडळातर्फे रोज लहान मुलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन होत आहे.तसेच आळंदी परिसरातील अनेक मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. तर गोपाळ कृष्ण मंदिर देवस्थान येथे आकर्षक गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.यंदा बहुतेक गणेश मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई वर भर दिलेला दिसून येत आहे.आळंदीमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे पाहण्यासाठी हळूहळू गणेशभक्तांमुळे रस्ते फुलत (Alandi) आहेत.