Alandi : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्य निवडणुक यशस्वी रित्या पार

[ad_1]

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्य निवडणुक 2024 (Alandi)कार्यक्रमानुसार प्रत्यक्ष मतदान दिनांक 11 रोजी वार बुधवार सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत यशस्वीरित्या पार पडले. त्यानंतर दिनांक 11 रोजी बुधवार सायंकाळी 5 वाजता मतमोजणी करण्यात आली. एकूण मतदान 365 मतदान होते प्रत्यक्ष 263 मतदान झाले.त्यामध्ये अवैध मतदान 3 तर वैध मतदान 260 झाले.

उमेदवार गणेश अनंता नेटके यांना एकुण मिळालेली 37 मते तर उमेदवार संतोष लक्ष्मण सोनवणे यांना एकूण मिळालेली मते 223 मिळाली.

संतोष सोनवणे
(आरक्षण प्रवर्ग,अनुसूचीत जाती) विजयी झाले आहेत.

आळंदी शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम 2024 दि.04/09/2024 नुसार नामनिर्देशन पत्रे माघारी घेतल्या नंतर (Alandi) खालील प्रवर्गाकरीता केवळ एक नामनिर्देशन पत्र वैध असल्याने बिनविरोध निवड झालेले प्रवर्गनिहाय उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.

1)काजल विकास धोंडगे, इतर मागासवर्ग (महिला)(आरक्षण प्रवर्ग) ,2) ज्ञानेश्वर बन्सी भोसले, विकलांग/ दिव्यांग(आरक्षण प्रवर्ग) 3) मंचक बाळासाहेब यादव,सर्वसाधारण(आरक्षण प्रवर्ग),4)गणेश पंडीत काळे ,सर्वसाधारण(आरक्षण प्रवर्ग),5)सुनिता बाबाजी ठुबे,सर्वसाधारण (महिला) (आरक्षण प्रवर्ग)

Screenshot 2024 0911 205308

Wakad : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झाला ‘त्या’ व्यक्तीचा खून; आरोपीला बारा तासांत बीड मधून अटक

आळंदी शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2024 अंतर्गत खालील दोन प्रवर्गात छानणी अंती एकही नामनिर्देशन पत्र वैध न ठरल्याने 2 जागा रिक्त राहिल्या आहेत.1)अनुसूचीत जमाती,2)अल्पसंख्यांक (महिला).

याबाबत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

[ad_2]