Alandi : आळंदी शहरात मद्यपींची दिवसेंदिवस वाढ ; सामान्य नागरिकांना होत आहे नाहक त्रास


एमपीसी न्यूज –  आळंदी येथील गावठाणात अवैध दारू मिळण्याचे ठिकाण असून सकाळीच तेथे मद्यपींची रांग लागते. मद्यपी मद्य (Alandi) पिल्यांनातर त्या परिसरात नेहमी गोंधळ घालत  तो परिसर अशांत करतात. त्यामुळे नागरिकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. चाकण चौक,वडगांव चौक,प्रदक्षिणा मार्ग ,महाद्वार या परिसरात ते मद्याच्या धुंदीत  पडलेले असतात.

K D Sonigara Jewellers

Pimpri : एच. आय. व्ही. बाधितांसोबत गोमय रक्षासूत्राच्या माध्यमातून अनोखे रक्षाबंधन साजरे 

तसेच इंद्रायणी नदी घाटावरदेखील मद्यपी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. नदी घाटावर  येणाऱ्या नागरिकांना या मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंद्रायणी घाटावर कपडे चोरी जाणे,मोबाईल इ. वस्तू चोरी जाणे या समस्येंचा नागरिकांना सामना करावा लागत आहे . आळंदी शहरात या मद्यापींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गावठाणात सकाळीच मद्य मिळवण्यासाठी अनेक मद्यपी एका ठिकाणी बसलेला फोटो व्हाट्स अप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. पोलीस प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत (Alandi) आहेत.