Alandi: तरुणाईने आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे


एमपीसी न्यूज -माणसाच्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या (Alandi)नाहीत असा कोणी नाही. चढ उतार हे आयुष्यामध्ये होत असतात. अशावेळी खंबीरपणे सामना करणे,हे योग्य ठरते. कोणत्याही परिस्थितीत मनामध्ये नकारात्मक विचार येता कामा नये.आयुष्य जगत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे.

तरूणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात,करियर ,आर्थिक समस्या,तणावा मुळे तसेच वैयक्तिक नातेसंबंध, प्रेम /आकर्षण, ह्या मधील गोंधळाच्या मधून निर्माण होणारे प्रश्न हे मानसिक अस्वास्थ्य आणि आत्महत्येशी खूप जवळून संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येते. याविषयी कुटुंबात मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण निर्माण करण्यातून अनेक प्रश्नांची तीव्रता कमी होऊ शकते. ‘आयुष्यात अपयश आले म्हणजे आता आपण जगण्यास लायक राहिलो नाही’ हा विचार अनेक लोकांना आत्महत्येच्या कृतीकडे नेतो.

Screenshot 2024 0905 150513

Akurdi : मंद तारकांनी मैत्री कट्ट्याचे तारांगण फुलवले ; सँडविक मैत्री कट्ट्याचा सहावा वर्धापन दिन साजरा

अपयशाला सहजपणे सामोरे जाणारी मानसिकता घडवण्याचे महत्व देखील ह्या निमित्ताने अधोरेखित होते. कुठल्याही परिस्थिती मध्ये खचू नये.मानसिक स्वास्थ्य बिघडू न देणे.आपल्या कुटुंबा सोबत ,मित्रां बरोबर समस्ये विषयी मनमोकळे बोलणे.आयुष्य जगताना सकारात्मक विचार ठेवणे.मनात नकारात्मक विचार येऊ न देणे.

देशात विविध कारणांमुळे अनेक व्यक्ती आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता भासत आहे.यासाठी शासनाने मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम व त्यासंबंधीत योग्य ते धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

मानवी जीवन जगत असताना आत्महत्या हा शेवटचा पर्याय असू शकत नाही.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ,समस्ये विषयी मनमोकळे बोलून ,योग्य त्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन आयुष्य सकारात्मक पणे जगले पाहिजे.