Alandi : पालिकेच्यावतीने पर्यावरणपुरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा; स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 12

[ad_1]

एमपीसी न्यूज –  आळंदी नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा 5.0 अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत शहरात पर्यावरण संवर्धन जागृती होण्याच्या (Alandi)उद्देशाने शहरातील पर्यावरण पूरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या गणपती सजावटीची 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत नगरपरिषदेच्या 9284454530 या व्हाॅट्सअप नंबर वर ऑनाइन पाठवावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Talegaon : लोकनृत्य स्पर्धेत नवीन समर्थ विद्यामंदिर प्रथम

सजावट  पर्यावरण पूरक/नैसर्गिक साधनाचा वापर करून केलेली आणि स्वच्छ सर्वेक्षण/माझी वसुंधरा संदेश देणारी असावी. व्हिडिओमध्ये सुरवातीला नाव ,पत्ता ,मोबाईल क्रमांक सांगावा व्हिडिओ शूट करताना पर्यावरणपूरक सजावटीची माहिती सांगावी.

IMG 20240911 WA0003

आकर्षक बक्षीसे 

प्रथम पारितोषक :- 3000.

द्वितीय पारितोषिक:- 2000.

तृतीय पारितोषक:- 1000.

नागरिकांसाठी सूचना :- शहरातील जलाशयाचे प्रदूषण रोखण्यासाठी पीओपी ची मूर्तीची स्थापना करू (Alandi)  नये. पर्यावरणपूरक साहित्याने निर्माण केलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. मूर्तीच्या सजावटीकरिता प्लास्टिक व थर्माकोल वापर करू नये.

[ad_2]