Bhosari : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नका; भाजप चिटणीसाची मागणी

[ad_1]

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भोसरीतून (Bhosari) आमदार महेश लांडगे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी देण्यात येवू नये, अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे भाजपमधील गटबाजीला पुन्हा उधाण आले आहे.

काळभोर यांनी म्हटले आहे की, मोशीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडा गेला आहे. हे प्रकरण शहरात गाजत आहे. आमदार लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रथम जागा बदलली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाच कोटी पन्नास लाख रुपये वाया गेले.

त्यानंतर नवीन ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. तिथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडे पडले आहेत. त्यामुळे विरोधकांनी भारतीय जनता पक्षांची व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची बदनामी सुरू केली.

त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिक नाराज झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

Alandi : महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे – साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज

त्यामुळे भारतीय जनता पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांना (Bhosari) भाजपची उमेदवारी देण्यात येवू नये. आमदार महेश लांडगे यांच्या वादग्रस्त भुमिकामुळे भोसरी विधानसभा कायमस्वरूपी चर्चेत राहिला असून स्थायी समिती सभापती यांना महापालिका मुख्य इमारत मधील दालनात भष्टाचार प्रकरणी लाच लुचपत पथकाने अटक केली होती, याकडेही काळभोर यांनी लक्ष वेधले.

 

[ad_2]