Chakan: माल विक्रीच्या बहाण्याने महिलेची सात लाखांची फसवणूक

[ad_1]

एमपीसी न्यूज – HRCR plate coil हा माल विकण्याच्या बहाण्याने महिलेची तब्बल सात लाख (Chakan)रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक 14 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी 2014 या कालावधीत चाकण शिक्रापूर येथे घडली आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी फ्रान्सिस डिसिजन सेल्स सर्विस एक्झिक्युटिव्ह गुलालवाडी ,मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bawdhan: फोटो डिलीट केला नाही या कारणावरून तरुणासह दोघांना बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, HRCR plate coil हा माल फिर्यादी यांना देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याकडून आरटीजीएस द्वारे 6 लाख 98 हजार 192 रुपये घेत कोणतेही साहित्याची विक्री न करता व पैसे परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

[ad_2]