Chinchwad :मंगलमूर्ती वाड्यात सामूहिक अथर्वशीर्ष पठण


एमपीसी न्यूज – संस्कृती, संवर्धन व विकास महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे चिंचवडगावातील मंगलमूर्ती वाड्यात (Chinchwad) आयोजित सामुदायिक अथर्वशीर्ष पठण रविवारी उत्साहात झाले.

 

IMG 20240909 WA0020

700 भाविकांचे मुखोद्गत सूर उमटल्याने वातावरण मंगलमय झाले. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे हे 12 वे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात दिलीप तांबोळकर यांनी शंखनादाने केली. पारंपरिक पेहरावातील महिलांनी – पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी सभामंडपामध्ये गर्दी केली होती. शंखनादानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायास नमन केले. भाविकांनी हात उंचावून टाळ्यांचा गजर करत गणरायाला अभिवादन केले.

 

Kalewadi : संत निरंकारी मिशनद्वारा काळेवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 

ऋषिपंचमीनिमित्त गणेश भक्त, भजनी मंडळ सदस्यानी अथर्वशीर्ष पठण करत प्रसन्नतेची अनुभूती दिली. गायत्री परिवाराने श्री गायत्री गणेश याग केला. यप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र देशपांडे, भास्कर रिकामे, शिवानंद चौगुले, रविकांत कळंबकर आदी उपस्थित होते.

 

किसन महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित जगताप यांनी आभार (Chinchwad) मानले.