[ad_1]
एमपीसी न्यूज – शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांनी देहूरोड (Chinchwad )येथील संरक्षण खात्याच्या 29 F.A.D. या डेपो मध्ये जाऊन संरक्षण खात्याचे अधिकारी व जवान यांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरा केला.
मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्य दलातील अधिकारी व जवान देश सेवेसाठी आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर असतात. अशावेळी आपल्या कुटुंबीयांबरोबर त्यांना कोणतेही सण साजरे करता येत नाही. आज रक्षाबंधन असल्याने, देशाचे रक्षण करणारे सैन्य दलातील अधिकारी व जवान यांना श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या, असे महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सारिका रिकामे यांनी सांगितले.
Pimpri : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसह सात हजार नावे
यावेळी लेफ्टनंट कर्नल पोनाप्पा हे देखील राखी बांधण्यासाठी उपस्थित होते. सारिका यांनी महिला मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमासाठी क्षमा काळे, नीलिमा भंगाळे, मोहिनी शिराळकर, सविता राणे, सुनिता वायाळ, गीतांजली पाटील, स्मिता शिरसाट, रीना शिंदे उपस्थित होत्या. सर्व जवानांनी आपल्या बहिणी विषयी आदर व्यक्त केला. त्याचबरोबर या डेपोमध्ये महिला भगिनींसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
[ad_2]