Dehugaon :  स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज  – सुनील शेळके


एमपीसी न्यूज – आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज आहे असे मत मावळचे आमदार सुनील शेळके ( Dehugaon) यांनी व्यक्त केले.

श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मधील रोबोटिक व सायन्स लॅब, संगणक कक्ष व मुलींसाठी काॅमन रुमचे उद्घाटन  आमदार  शेळके, देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांच्या शुभहस्ते संपन्न ( Dehugaon) झाले.

आमदार शेळके म्हणाले की, अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची कृती नक्कीच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांना घडवायचे असेल तर शैक्षणिक प्रणालीला 21 व्या शतकातील अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी. एखाद्या शिक्षकाने ठरविले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल! एखादी संस्था नावारूपाला येण्यास बरीच वर्षे लागतात. पण सृजन फाउंडेशनने लावलेले इवलेसे रोप आज वटवृक्षात बदलले आहे. ते ही अवघ्या पाच सहा वर्षात ! नि:स्वार्थी भावनेतून जेव्हा एकत्र येऊन काम केले जाते तेव्हा ते काम नक्कीच नजरेत भरते.

Pune : “घरात स्वातंत्र्य नाही, मोबाईल ही पाहू दिला जात नाही..”, म्हणत तिघींनी घर सोडलं, वाचा पुढे काय घडले…

रोबोटिक व सायन्स लॅबच्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीतून भावी शास्त्रज्ञ ( Dehugaon) घडविण्याचे काम केले जाईल असे मत इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे संचालक व इस्त्रोचे सल्लागार संतोष पिसे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बालेवाडी येथील खंडेराय प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, बाणेर येथील अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष अशोकराव मुरकुटे, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डाॅ. भुजबळ, तहसिलदार अजिंक्य सावंत, वडगांव मावळचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक सुधीर काळोखे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, सचिव प्रा.विकास कंद, ॲड.संजय भसे, प्रशांत काळोखे, प्राचार्या डॉ.कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, शिक्षकवृंद, शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षा ॲड. गीतांजली जगताप, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी सूत्रसंचालन तर रोबोटिक विभाग प्रमुख स्नेहल शिंदे यांनी ( Dehugaon) आभारप्रदर्शन केले.