Skip to content

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

  • 1 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज –  बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली (Malaika Arora)  आहे. अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.  

Kalewadi : प्रेयसीचा खून करून मृतदेह आईच्या घरासमोर ठेवला; प्रियकर पसार

पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही.  मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईसाठी रवाना झाली.अनिल अरोरा हे भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. ते प्रसिद्धीपासून दूर राहिले. अनिल अरोरा हे भारतीय सीमावर्ती फाजिल्का शहरातील पंजाबी होते तर अभिनेत्रीची आई जॉयस पॉलीकार्प मल्याळी ख्रिश्चन आहे. मलायका 11 वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला  (Malaika Arora)  होता.

 

[ad_2]