Maval : दीड महिना सुश्रुषा केल्यानंतर सापाच्या पाच पिलांचा जन्म


एमपीसी न्यूज – दीड महिना सापाच्या अंड्याची निगा राखली. त्याला उबदार वातावरण करून योग्य ( Maval) काळजी घेतली. त्यानंतर अंड्यातून पाच गोंडस सापाच्या पिलांनी जन्म घेतला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निनाद काकडे यांनी यासाठी प्रयत्न केले.

IMG 20240911 WA0002 1

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील दीड महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडे शहरात एक साप आणि त्याची पाच अंडी आढळली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद भास्कर माळी यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तिथे जाऊन पाहणी केली असता एक तस्कर (कॉमन त्रिंकेत) जातीचा साप होता. तिथेच त्याची पाच अंडी होती.

Alandi : पालिकेच्यावतीने पर्यावरणपुरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा; स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 12

 

सापाला त्याच्या अधिवासात मुक्त केले आणि ती अंडी सुरक्षितपणे संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना दिली. त्यांनी त्या अंड्यांना ऊब देण्यासाठी ठेवले. दीड महिन्यानंतर ती पिल्लं अंड्यातून बाहेर आली. याची माहिती वनरक्षक योगेश कोकाटे यांना देऊन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद रोहित पवार आणि जिगर सोलंकी यांनी पिल्लांच्या आरोग्याची तपासणी करून ती स्वस्थ असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

IMG 20240911 WA0007

वन्यजीव अभ्यासक जिगर सोलंकी यांनी सांगितले की, तस्कर हा बिनविषारी जातीचा साप आहे. तो लोक वस्तीत जास्त प्रमाणात आढळून येतो. हा साप उंदीर, बेडूक व इतर छोटे प्राणी खातो. या सापाचा कोणाला दंश झाला तरी काहीही होत नाही. हे साप आपल्या घराच्या आवारात त्यांचे भक्ष खाण्यासाठी येतात. तरी आपण बाहेर फिरताना काळजी घ्यायला हवी. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. कोणत्याही वन्य प्राण्याला मारू नये.”

 

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळ पासच्या प्राणीमित्राला अथवा वनविभागला संपर्क (1926) करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक( Maval) निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.