PCMC : ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ जनजागृती मोहिमेस अवघे काहीच दिवस बाकी….


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ (PCMC)जनजागृती मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. या मोहिमेत 18 ते 70 वयोगटातील नागरिकांच्या सुमारे 2 हजारपर्यंत सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या असून नागरिकांना आपल्या परिसरातील विकासकामे सुचवण्यासाठी ही संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचा शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.

नागरिकांमध्ये या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने एलईडी व्हॅन, सोशल मीडिया तसेच रेडिओच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत असून मोहिमेची माहितीही देण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेमुळे शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग हा उपक्रम पोहोचविण्यात महापालिका यशस्वी ठरली आहे.

ज्या नागरिकांना सूचना, कल्पना, मते नोंदवायची आहेत त्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन फॉर्मद्वारे आपली मते नोंदवावीत आणि शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे. ऑनलाईन फॉर्ममध्ये रस्ते, पथदिवे, पदपथ, उद्याने, मैदाने, बस स्टॉप्स/ बीआरटीएस, ईव्ही चार्जिंग, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, वाचनालये, नाट्यगृहे, सार्वजनिक शौचालये, पार्किंग सुविधा, सायकल ट्रॅक्स, ट्रॅफिक लाइट्स, जलतरण तलाव, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पावसाळी पाण्याचा निचरा, मैला व्यवस्थापन आदींबाबत नागरिकांनी आपली मते नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Chakan : घोरावडेश्वरावर वृक्षप्रेमींचा सन्मान

नागरिकांनी सूचना, कल्पना, मते नोंदविण्यासाठी खालील लिंकचा किंवा बारकोडचा वापर करावा –
http://fxurl.co/9kiz9