Skip to content

PCMC : पावणेतीन लाख नागरिकांना देणार ‘बीसीजी’ची लस

  • 1 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज – क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी बीसीजी लसीचा वापर (PCMC)करण्यात येतो. ही लस आता प्रौढ व्यक्तींना देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येत आहे.

क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. बीसीजी लस ही सुरक्षित आहे. देशांत प्रौढांमध्ये होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बीसीजी लसींचा वापर होत आहे. त्यासाठीच पालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रौढांना बीसीजी लस देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती, मधुमेह असणारी व्यक्ती, मागील पाच वर्षात टीबी आजार झालेल्या व्यक्ती देण्यात येणार आहे.

Amol Kolhe : भ्रष्टाचाराचे आणि महिलांच्या असुरक्षिततेचे संकट दूर होऊ दे -अमोल कोल्हे

बीसीजी लस देण्यासाठी आशा स्वंयसेविकामार्फत शहरात घरोघर सर्वेक्षण करण्यात आले आहे. तीन लाख 28 हजार 657 अपेक्षित लाभार्थीची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 लाख 78 हजार 703 लाभार्थीनी ही लस घेण्यासाठी संमती दिली आहे. ही लस जे लाभार्थी संमती देतील त्यांनाच देण्यात येणार आहे. लस देण्यासाठी महापालिकेच्या 8 रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

याबाबत महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, 18 वर्षांवरील वर्गासाठी ही लस देण्यात येणार आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या लसीचा लाभ घ्यावा.

 

[ad_2]