[ad_1]
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी निकृष्ट कामे करणा-या 11 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकल्यानंतर आता ( PCMC) त्या कामांवर देखरेख ठेवणा-या अधिका-यांकडे माेर्चा वळविला आहे. त्यानुसार सुमारे 25 उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना नाेटीसा बजाविल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. त्यामुळे आता आयुक्त आणि शहर अभियंता दाेषी अधिका-यांवर काय कारवाई करतात, हे पाहणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागातील रस्ते दुरूस्ती, पेव्हींग ब्लाॅक, मातीचे जाॅगिंग ट्रॅक यासारखी कामे घेताना 11 ठेकेदारांनी 14 विकास कामात तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरल्या हाेत्या. मात्र, एवढ्या कमी दरात कामे घेतल्यानंतर त्याचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहिल का? याची आयुक्त सिंह यांना खात्री नव्हती. त्यामुळे सिंह यांनी अशा 11 कंत्राटदाराच्या 14 कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश महापालिका दक्षता विभागाला सप्टेंबर 2022 मध्ये दिले होते. दक्षता विभागाने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपीचा) कडून कामांच्या दर्जाची तपासणी करून घेतली.
Pune : सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाची सायबर चोरट्यांनी केली फसवणूक
सीओईपीने केलेल्या तपासणीत पेंव्हीग ब्लाॅकच्या कामात ब्लाॅक खचलेले, ज्याठिकाणी दुरूस्ती आवश्यक अशा ठिकाणी दुरूस्तीच केली नाही, महापालिका मानांकनानुसार काम नाही, रस्ते दुरूस्ती केल्यानंतर त्वरित खड्डे पडणे, काॅक्रिट थराची जाडी कमी असणे, जाॅगिंग ट्रॅकवर कमी माती टाकणे, निविदेनुसार काम न करणे अशा विविध बाबी समाेर आल्या. त्यामुळे दाेषी असलेल्या 11 ठेकेदारांना एका वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ठेकेदारांकडून निकृष्ट झालेल्या कामाचा दुप्पट खर्च वसूल करण्याचाही निर्णय घेतला आहे.
दक्षता समितीने निकृष्ट झालेल्या कामांवर देखरेख असलेल्या अधिका-यांची माहिती शहर अभियंत्यांकडून मागविली हाेती. त्यानंतर आता 11 ठेकेदार निकृष्ट कामे करत असतानाही डाेळेझाकून काम पाहणा-या सुमारे 25 उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नाेटीस धाडली. त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही केली ( PCMC) जाणार आहे.
महापालिकेची विकास कामे निकृष्ट हाेत असताना त्याकडे दुर्लक्ष करणा-या सुमारे 25 उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना नाेटीस बजावून खुलासा मागविला आहे. त्यांच्या खुलाशानंतर आयुक्तांशी चर्चा करून याेग्य ती कार्यवाही केली जाईल.
मकरंद निकम,शहर अभियंता .
[ad_2]