Skip to content

Pimple saudagar : शिवार चौकातील वाहतूक कोंडी सुटणार – नाना काटे

  • 1 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर येथील शिवार चौकातील सर्कल काढण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी ( Pimple saudagar) सुटणार आहे.

Pimpri : उपायुक्त रविकिरण घोडके यांची बदली

शिवार चौक हा नाशिक फाटा ते हिंजवडी बीआरटीएस रस्त्यावरील मुख्य चौक असून शहरातील व परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास हा रस्ता सोयीस्कर आहे. नागरिक या रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे शिवार चौक येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. यामुळे या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.  नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी व सोसायटीतील रहिवासी यांनी देखील या वाहतूक कोंडी बाबत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व माजी नगरसेविका शितल काटे यांच्याकडे तक्रारी करीत होते. त्यानुसार नाना काटे यांनी वेळोवेळी वाहतूक विभाग व संबधित महापालिकेच्या बीआरटीएस विभागाशी चर्चा करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व  नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शिवार चौकातील सर्कल काढण्याचा सुचना केल्या होत्या.

महापालिकेच्या बीआरटीएस विभाग व वाहतुक पोलीस विभाग यांच्या वतीने शिवार चौक याठिकाणी असलेला सर्कल काढुन टाकण्यात आला. त्यामुळे आता शिवार चौकातील वाहतूक कोडींतून नागरिकांची  ( Pimple saudagar)  सुटका होणार आहे.

 

[ad_2]