Pimpri : दिव्यांग भवन फाऊंडेशन तर्फे बोधचिन्ह, घोषवाक्य स्पर्धा


एमपीसी न्यूज –  दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे बोधचिन्ह, घोषवाक्य स्पर्धेचे( Pimpri ) आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिव्यांग भवन फाऊंडेशन  हे सर्व दिव्यांग व्यक्तींच्या थेरपी, दिव्यांगांचे पुनर्वसन( Pimpri ) करण्यासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य आणि सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. दिव्यांग भवन फाऊंडेशनसाठी  लोगो (बोधचिन्ह) व टॅगलाईन (घोषवाक्य मराठी व इंग्रजी मध्ये) निश्चित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन 15 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आले आहे.

Bhosari : विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांना समाधान मिळते – अनिल जाधव

स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्या स्पर्धकास आकर्षक बक्षीसे दिले जाणार आहेत. यामध्ये लोगो (बोधचिन्ह) स्पर्धा विजेत्यास 50,000 हजार रुपये, घोषवाक्य (मराठी) स्पर्धा विजेत्यास 25,000 हजार रुपये आणि घोषवाक्य (इंग्रजी) स्पर्धा विजेत्यास 25000 हजार रुपये  देण्यात येणार आहेत. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी  pcmcdivyangbhavan.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी ( Pimpri ) केले.