Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये जिम्नॅस्टिक खेळातील प्रथम आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून हर्षद कुलकर्णी यांची नवी ओळख

[ad_1]

एमपीसीन्यूज – काऊलून, हाँगकाँग येथे दिनांक १० ते १४ ऑगस्ट रोजी (Pimpri)आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघटनेतर्फे आशियाई जिम्नॅस्टिक युनियन व हाँगकाँग जिम्नॅस्टिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एरोबिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक प्रशिक्षण वर्ग लेव्हल 1 संपन्न झाला. या वर्गाला भारतातून महाराष्ट्राचे हर्षद कुलकर्णी व गुजरातचे सागर बिडीवाला यांनी निवड झाली होती. 8 देशांमधून 21 प्रशिक्षकांनी या वर्गात सहभाग नोंदवला होता. बल्गेरियाच्या कोच देसी व पोर्तुगालच्या कोच ऐना यांनी या वर्गास मार्गदर्शन केले.

हर्षद कुलकर्णी हे रहायला चिंचवडमध्ये असून गेली 18 वर्षे एरोबिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात कार्यरत आहेत. आजवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडमधील सर्वाधिक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू हेवन जिम्नॅस्टिक अकादमीच्या माध्यमातून घडवण्याचा मान आहे. तसेच लेव्हल १ च्या प्रशिक्षण वर्गात निवड झालेले पिंपरी चिंचवडमधील पहिले प्रशिक्षक आहेत. सदर परीक्षेत प्रथम दर्जाने ते उत्तीर्ण झाले आहेत.

Pune : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार

यानिमित्ताने त्यांनी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघटना, राज्य संघटना व पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक संघटनेचे आभार मानले. माझ्या सर्व खेळाडू, पालक व सहकारी प्रशिक्षकांमुळे हे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून जिम्नॅस्टिक संघटना सचिव मकरंद जोशी, उपाध्यक्ष आदित्य जोशी, भारतातून युमनाम रंजन, सुरेंद्रपाल सिंग, सुनील छत्री, कौशिक बिडीवाला, संजोग ढोले, पिंपरी चिंचवडमधून संघटना अध्यक्ष संजय मंगोडेकर, संजय शेलार, दिपक सुनारिया, मनोज काळे यांनी हर्षद यांचे कौतुक केले.

 

 

[ad_2]