[ad_1]
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे सौर उर्जेवर ( Pimpri ) चालणाऱ्या हवामान, वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राला मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी ब्रेंडा सोया यांनी भेट दिली.
यावेळी समन्वयक अनन्या घोष तसेच पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
PCMC : महापालिका शहरातील पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार
ब्रेंडा सोया यांनी हवामान निरीक्षण केंद्राचे कार्य, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदी, हवामान बदल याविषयी माहिती जाणून घेतली. नोव्हेंबर 2023 मध्ये सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयुएनवाय) आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या द्वारे या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यूएस कॉन्सुलेट जनरल- मुंबई द्वारे ब्रॉन्क्स समुदायाला प्रदान केलेल्या अनुदानाद्वारे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प बीसीसी, सीयुएनवाय आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातील सहकार्याने विकसित करण्यात आला असून प्रकल्प सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे रसायनशास्त्र विभागप्रमुख, अर्थ आणि एन्व्हायरमेंटल सायन्स प्राध्यापक नील फिलिप्स आणि प्राध्यापक परिमिता सेन यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला आहे. हे हवामान केंद्र विस्तृत प्रमाणात हवामान संबंधी डेटा जसे तापमान, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरण, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता गोळा करते. जमा झालेला डेटा डेव्हीस वेदर लिंक ॲपद्वारे रिअल टाईम मध्ये उपलब्ध होतो. त्याचा फायदा हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ( Pimpri ) ठरतो.
[ad_2]