[ad_1]
एमपीसी न्यूज – बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (शनिवारी) राज्यभरात मूक आंदोलन ( Pimpri) करण्यात येत आहे. पिंपरीतही भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, विनायक रणसुभे, मारुती कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, देवेंद्र तायडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळच्या महिला संघटिका शैला खंडागळे, अनिता तुतारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
Pawna Dam : पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून 3500 क्युसेकने विसर्ग
सर्वांनी तोंडाला, डोक्याला काळ्या भिती बांधून निषेध केला. लाडकी बहीण नको,सुरक्षित बहीण पाहिजे, फेल गृहमंत्री असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. भर पावसात हे आंदोलन करण्यात आले.
पुण्यातही आंदोलन
बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भर पावसात आंदोलन करण्यात आले. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला असताना शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची ( Pimpri) शपथ दिली.
[ad_2]