Skip to content

Pimpri : शहरात डेंग्यूचे 82, चिकनगुनियाचे 10 तर झिकाचे 5 रुग्ण

  • 1 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri)कार्यक्षेत्रात डेंग्यू आजाराचे 82 रुग्ण, चिकुनगुनिया आजाराचे 10 रुग्ण व झिका आजाराचे 5 रुग्ण आढळुन आलेले आहेत. या रुग्णांपैकी 3रुग्ण गर्भवती महिला आहे. तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे  त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. डेंग्यू, चिकुनगुण्या व झिका आजारांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आलेली कार्यवाही खालीलप्रमाणे आहे.

Bhosari : विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांना समाधान मिळते – अनिल जाधव

डेंग्यु मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत रविवारी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या घरी साफसफाई व डासोत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही केली.

 

[ad_2]