Pimpri : स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाची एफआयपीएससीबीवर मात

[ad_1]

एमपीसी न्यूज : गतविजेत्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (Pimpri) आणि उपविजेत्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) संघांनी चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतर विभागीय स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सहज विजय मिळवले.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर येथे सुरू झालेल्या स्पर्धेत पीएसपीबी आणि आरएसपीबीने आश्वासक सुरुवात केली तरी युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड (एसपीएसबी) संघाने अनुभवी अखिल भारतीय पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डवर (एफआयपीएससीबी) 2-1 अशी मात केली.

NSN 1284

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळलेला दिलप्रीत सिंग तसेच अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाशदीप सिंग आणि धरमवीरचा भरणा असलेला एफआयपीएससीबी 0-2 अशा पिछाडीवर पडला. अब्दुल कादिर (29 वे) आणि आलोक कंदुलना यांनी (53वे) एसपीएसबीला आघाडीवर नेले. सिमरनजीत सिंगने(58 वी) गोल करताना चुरस कायम ठेवली तरी स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या पोलीस स्पोर्ट्स संघाला निसटता पराभव पाहावा लागला.

तत्पूर्वी, दिवसा पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने अ गटामध्ये मैदानी गोल करताना केंद्रीय सचिवालयाला 5-0 असे हरवले.. (Pimpri) तलविंदर सिंग (चौथा), शिलानंद लखरा (26वा, 56वा) दुहेरी आणि अरमान क्वेशी (33वा), रोसन मिन्झ (41वा) यांनी प्रत्येकी एक गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.

ब गटामध्ये, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशनने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकॅडमीचा 13-0 असा धुव्वा उडवला. दिवसभरातील सर्वाधिक फरकाने मिळवलेला हा विजय ठरला.

परदीप सिंग (7वा, 17वा – 52वा) आणि शेष गौडा बीएम यांचे (26वा, 29वा – पीसी, 40वा – पीसी) प्रत्येकी तीन तर शिवम आनंद यांचे (9वा, 11वा – पीसी) प्रत्येकी दोन तसेच दर्शन गावकर (12वा), जोगिंदर सिंग (13वा – पीसी), सिमरनजोत सिंग (37वा), युवराज वाल्मिकी (55वा) आणि गुरसाहिबजीत सिंगचा (58वा) प्रत्येकी एक गोल त्यांच्या मोठ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

IMG 20240905 WA0096

दिवसभरातील चौथ्या सामन्यात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस – सेंट्रल हॉकी टीम आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्यातील अ गटातील लढत 4-4 अशी बरोबरीत सुटली. आयटीबीपीसाठी रोशनने पेनल्टी कॉर्नरवर (41वे आणि 47वे) पेनल्टी कॉर्नर आणि अनिलने (49वे आणि 55वे) केलेले गोल महत्त्वपूर्ण ठरले. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेससाठी विकास चौधरी (23वे), नचप्पा इर (30वे), प्रणम गौडा टीएम (52वे – पीसी) आणि आर मणिकंदन यांनी (60वे) गोल केले.

Pune : कसबा कला करंडक 2024 च्या माध्यमातून कलाकारांनी केली गणरायाची सेवा

तत्पूर्वी, डॉ. राजेश देशमुख (आयएएस), क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांच्या हस्ते चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतर विभागीय स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यावेळी कृष्ण प्रकाश, आयपीएस, एडीजी, फोर्स वन महाराष्ट्र पोलीस आणि हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थितीत होती.

निकाल (Pimpri)

अ गट: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड: 5 (तलविंदर सिंग चौथा; शिलानंद लखरा 26वा, 56वा; अरमान क्वेशी 33वा; रोसन मिन्झ 41वा) विजयी वि. केंद्रीय सचिवालय: 0. हाफटाईम: 2-0

अ गट: आयटीपीबी सेंट्रल हॉकी संघ: 4 (रोशन 41वा – पीसी, 47वा – पीसी; अनिल 49वा – पीसी, 55वा – पीसी) बरोबरी वि. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस 4 (विकास चौधरी 23वा; नचप्पा 30 वा, प्रणाम गौडा 52वा पीसी; आर मणिकंदन 60 वा). हाफटाईम: 0-2

ब गट: रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन: 13 (परदीप सिंग 7वा, 17वा 52वा; शिवम आनंद 9वा, 11वा – पीसी; दर्शन वैभव गावकर 12वा; जोगिंदर सिंग 13वा – पीसी; शेष गौडा बीएम 26वा, 29वा – पीसी.40 पीसी; सिमरनज्योत सिंग 37वा; युवराज वाल्मिकी 55वा, गुरसहिबजीत सिंग 58वा) विजयी वि. स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकॅडमी: 0. हाफटाईम: 6-0

IMG 20240905 WA0121

ब गट: अखिल भारतीय पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड: 1 (सिमरनजीत सिंग 58वे) पराभूत वि. स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड: 2 (अब्दुल कादिर 29वे; आलोक कंदुलना 53वे). हाफटाईम: 0-0.

कॅप्शन

1326: सामना 4 – ऑल इंडिया पोलीस (रेड) वि. स्टील बोर्ड (स्काय ब्लू)

1284: सामना 3 – रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (रेड) वि. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात (पांढरा-निळा)

डब्लूए 0121: सामना 2 – आयटीबीटी सेंट्रल हॉकी संघ (पांढरा) वि. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (काळा)

डब्लूए 0096: सामना 1 – पेट्रोलियम (पांढरा) वि. केंद्रीय सचिवालय (केशरी)

[ad_2]