Pune : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या विभाग स्तरावरील इंग्रजी वादविवाद स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणेचा संघ विजयी


एमपीसी न्यूज -आर्मी पब्लिक स्कूल (एपीएस) पुणे येथे 24 ऑगस्ट 2024 रोजी (Pune)आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीची (AWES) विभाग स्तरावरील इंग्रजी वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एपीएस पुणेच्या स्पर्धकांनी उत्तम वक्तृत्व कौशल्य आणि सखोल विचारसरणी प्रदर्शित करत, स्पर्धेचे विजेते पद पटकावले.

‘कृत्रिम बुद्धिमत्तेला कायदेशीर अस्तित्व आणि अधिकार दिले जावेत’, या विषयावरील वादविवाद स्पर्धेत, प्रतिस्पर्धी संघांनी उत्तम संशोधनाच्या आधारावर मुद्द्याच्या दोन्ही बाजूंनी प्रभावीपणे युक्तिवाद केला आणि या चर्चेतून विचारांना चालना दिली.

एपीएस पुणेच्या संघाने, विषयाची आकर्षक मांडणी, बिनतोड युक्तिवाद आणि सुस्पष्ट वक्तृत्व कौशल्याने परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजेत्या संघात अनुष्का मेहता, सेरा मारिया जॉन्सन आणि शौर्यमन बिश्त या विद्यार्थ्यांचा समावेश होता. शौर्यमनला सर्वोत्कृष्ट इंटरजेक्टर (प्रतिस्पर्धी वक्त्याने मांडलेल्या विचारला आव्हान देणारा योग्य प्रश्न विचारणारा) म्हणूनही गौरविण्यात आले.

Ravet : रावेत इस्कॉन येथे दोन दिवस कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव

एपीएस देहू रोडच्या पवनी गोयल आणि अनुषा यांना अनुक्रमे विषयाच्या बाजूने आणि विरोधात सर्वोत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल गौरविण्यात आले.

युवा वक्त्यांच्या युक्तिवादाने कृत्रिम बुद्धिमत्तेला कायदेशीर अस्तित्व देण्याचे नैतिक, कायदेशीर आणि सामाजिक परिणामांचा धांडोळा घेतला, आणि या विषयाभोवती असलेल्या गुंतागुंतींच्या विचारांचे सखोल आकलन प्रदर्शित केले.

सहभागी संघांची उत्तम तयारी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाबद्दल परीक्षकांनी त्यांची प्रशंसा केली.

नुकत्याच पार पडलेल्या कमांड स्तरावरील हिंदी वादविवाद स्पर्धेतील दिमाखदार विजया पाठोपाठ, इंग्रजी वादविवाद स्पर्धेतील विजयाने एपीएस पुणे च्या यशात आणखी भर घातली आहे, आणि भविष्यातील स्पर्धांसाठी उत्तम दर्जा निश्चित केला आहे.

या शानदार विजयामधून एपीएस पुणेची उत्तम तयारी, बौद्धिक कुशाग्रता आणि कठोर प्रशिक्षण दिसून येते.