Pune : कसबा कला करंडक 2024 च्या माध्यमातून कलाकारांनी केली गणरायाची सेवा


एमपीसी न्यूज – पुण्यनगरीचे ग्रामदैवत मानाचा पहिला श्री. कसबा गणपती सार्वजनिक (Pune)गणेशोत्सव मंडळातर्फे, दरवर्षीप्रमाणे कसबा कला करंडक आयोजित करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, विश्वस्त सौरभ धोकटे, निलेश वकील, सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावर्षीचा कला करंडक रविवारी (दि.2) रोजी नवीन मराठी शाळा, मुख्य सभागृह येथे पार पडला. त्यावेळी 30 हुन अधिक संख्येने कलाकारांनी भाग घेतला होता. विविध कलागुण सादर करत सर्वांनी गणरायाची सेवा केली.

BJP : गुजरातचे माजी मंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी घेतला पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभांचा आढावा

कलागुण सादर करताना सर्व विद्यार्थ्यांचा, सादरकर्त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला.मंगलमय अश्या वातावरणात कसबा कला करंडक आनंदात पार पडला.