Skip to content

Pune : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला नदीकाठच्या परिसरात शिरले पाणी

  • 2 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज- धरण परिसरात आज (शनिवारी) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला (Pune)धरणातून सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे पुणे शहरातील नदी परिसरातील सखल भागात पाणी शिरले आहे.

मुठा कालवा पाठबंधारे उपविभागाचे दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6 च्या सुमारास खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून 19 हजार 118 वरून 23 हजार 122 क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाण नुसार हा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे.

मुठा नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे नदी पात्राच्या सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली असून नदी पत्रात पार्क केलेली वाहने पाण्यात अर्धी बुडाली आहेत.घटना स्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून वाहने रस्सीच्या साहाय्याने खेचून बाहेर काढली जात आहेत.

Talewade : आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश; तळवडेतील टॉवरच्या जागी मोनोपॉल उभारणार

यामध्ये डेक्कन, पुलाचीवाडी व टिळक पूल परिसर यांचा समावेश आहे. तर शिवाने, पाटील इस्टेट इथे देखील काही प्रमाणात पाणी साठले आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अग्नीशमन दलाकडून केले जात आहे.

 

[ad_2]