Pune : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघ उपांत्यपूर्व फेरीत


एमपीसी न्यूज -गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) संघ हॉकी महाराष्ट्र आयोजित (Pune )आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतर-विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. उपविजेता रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघानेही (आरएसपीबी) अंतिम 8 संघांतील स्थान निश्चित केले.

मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथील स्पर्धेत रविवार पहिल्या सामन्यात पीएसपीबीने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसवर (सीबीडीटी) 5-4 असा विजय मिळवला. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. सर्वाधिक 9 गुणांसह त्यांनी अ गटामध्ये अव्वल स्थान कायम राखले.

युसूफ अफानने (2रा – पीसी) पीएसपीबीचे खाते उघडले. त्यानंतर रोझन मिन्झच्या (9वा, 41वा) दोन गोलनी त्यात भर घातली. सुमित कुमार (38 वे) आणि दीपसन टिर्कीने (59 वे – पीसी) प्रत्येकी एक गोल करताना गोलसंख्या पाचवर नेली. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेससाठी विकास चौधरी (54वे; 60वे – पीसी) आणि प्रणम गौडा (29 वे – पीसी) तसेच मरीेश्वरन शक्तीवेलने (50 वे) गोल केले.

ब गटामध्ये, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (आरएसपीबी) स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डावर मात करताना तिसरा विजय मिळवला. आरएसपीबीकडून परदीप सिंग (33वा, 47वा) आणि (गुरसाहिबजीत सिंगने (23वा) गोल केले. या विजयासह आरएसपीबीने 3 सामन्यांतून त्यांची गुणसंख्या 9 वर नेली.

अन्य सामन्यांमध्ये, अ गटामध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीपीबी) सेंट्रल हॉकी संघाने सेंट्रल सेक्रेटरिएटविरुद्ध 3-3 अशी बरोबरी साधली. तरनजोत सिंग (16वे – पीसी), विजय कुमार गोंड (18वे – पीसी), अनिलने (57वे – पीसी) आयटीपीबीसाठी गोल केले. केंद्रीय सचिवालयाकडून कवलजीत सिंग (39 वे) आणि एम. हसन बाशाने (52वे, 53वे) गोल करताना बरोबरी साधली.

NSN 2371 M1B 1NSN 2460 M2 1NSN 2350 M1C 1

या बरोबरीसह आयटीपीबीने (2 सामने, 1बरोबरी) गुणांचे खाते उघडले. केंद्रीय सचिवालय संघाचे 4 गुण (3 सामने) झाले. अ गटात ते दुसऱ्या स्थानी आहेत.

अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळाने या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम निकालाची नोंद केली. ब गटात त्यांनी पोलीस संघाने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकादमीचा १७-२ असा मोठ्या पराभव केला. या सामन्यात आकाश सिंगने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. त्याने आठ गोल (12वे, 21वे – पीसी., 26वे – पीसी, 35वे, 41वे, 42वे – पीसी, 55वे, 58वे – पीसी) करताना सिंहाचा वाटा उचलला.टोकियो ऑलिंपियन दिलप्रीत सिंगने तीन (17वे – पीएस, 24वे, 46वे) तर हरिस मोहम्मद (21वा – पीसी), धरमवीर सिंग (33वा), पवन दीप सिंग (38वा), सिमरनजीत सिंग (48वा), शुभम (54वा) आणि कमलजीत सिंग (५६वा – पीसी) प्रत्येकी एक गोल करताना त्याला चांगली साथ दिली.स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकादमीकडून अजयकुमार बारियाने (२६वे; ३७वे – पीएस) दोन गोल केले.

या मोठ्या विजयासह पोलीस संघाने त्यांची संख्या 6 गुणांवर (3 सामने) नेली आणि ब गटामध्ये दुसऱ्या स्थानावर धडक मारली. गुजरातच्या क्रीडा प्राधिकरणाचा हा तिसरा पराभव आहे. परिणामी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Pune : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार

निकाल

अ गट: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड: 5 (युसूफ अफान 2रा – पीसी; रोसन मिन्झ 9वा, 41वा; सुमितकुमार 38वा; दिपसन तिर्की 59वा – पीसी) विजयी वि. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस: 4 (प्रणम गौडा वाय.एम. – 29 – पीसी; एम. सख्तीवेल 50वा; विकास चौधरी 54th; 60th – पीसी). मध्यंतर: 2-1

NSN 2539 M3A 1 NSN 2470 M2A 1 NSN 2496 M3 1

अ गट: इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) सेंट्रल हॉकी संघ: 3 (तरनजोत सिंग 16वा – पीसी; विजय कुमार गोंड 18वा – पीसी; अनिल 57वा – पीसी) बरोबरी वि. केंद्रीय सचिवालय: 3 (कवलजीत सिंग 39वा; हसन बशान 39वा ,53वा). मध्यंतर: 2-0.

ब गट: रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड: 3 (गुरसाहिबजीत सिंग 23वा; परदीप सिंग 33वा, 47वा) विजयी वि. स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड: 0. मध्यंतर: 1-0

ब गट: अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळ: 17 (आकाशदीप सिंग 12वा, 21वा – पीसी., 26वा – पीसी, 35वा, 41वा, 42वा – पीसी, 55वा, 58वा – पीसी; दिलप्रीत सिंग 17वा – पीएस, 24वा, 46वा; हॅरिस मोहम्मद 21वे पीसी; धरमवीर सिंग 33वे, पवन दीप सिंग 38वे, सिमरनजीत सिंग 48वे; शुभम 54वे, कमलजीत सिंग 56वे – पीसी) विजयी वि. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गुजरात – 2 (अजयकुमार बारिया 26वे; 37वे). मध्यंतर: 6-1.