Skip to content

Pune: म्हाडाचे निर्वाचीत अध्यक्ष  शिवाजीराव आढळराव पाटील यांचा  नागरी सत्कार

  • 3 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज – पुणे गृह निर्माण मंडळाचे नव निर्वाचित अध्यक्ष  खासदार  शिवाजीराव आढळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सर्व (Pune)सामाजिक तसेंच गणेशोत्सव, दुर्गाउत्सव मंडळे तसेच विविध सोसायटी यांचे वतीने गुरुवारी (दि.22) करण्यात आला.

या वेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित झालेला होता.जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मूर्तीस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली.

म्हाडाचे वसाहतीची स्थापना झाले पासून गेल्या चाळीस वर्षात संत तुकाराम नगर वसाहतीला भेट देणारे  शिवाजीराव आढळराव पाटील हे पहिलेच म्हाडाचे अध्यक्ष आहेत, त्या मुळे येथील शेकडो रहिवाशांनी उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले व आभार मानले.

प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अमर साबळे, म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील,मिळकत व्यवस्थापक विजयजी ठाकूर अधिकारी प्रकाशजी वाबळे तसेंच प्रा. दत्तात्रय भालेराव आदी उपस्थित होते.

Pune : शरद पवार यांनी दिली आंदोलकांना शपथ

महाराष्ट्रातील कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले असून, कायम कामगारांचे जागेवर सुरु असलेल्या कंत्राटी पद्धतीमुळे राज्यातील करोडो तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे,कोविड महामारीत अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे वतीने आम्ही लढे देत आहोत, परंतु संविधानाने दिलेल्या अधीकारा नुसार युनियन करताच कामगारांना कामावरून काढून टाकले जाते, माननीय न्यायालय न्याय देते त्याची अंमलबजावणी उद्योजक तर करत नाहीतच परंतु पालिकेतील आयुक्त, जिल्हाधिकारी देखील करत नाहीत, तरी राज्याचे .मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचेकडे या विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक लावून कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी प्रमुख मागणी पीडित कामगारांच्या वतीने या वेळी यशवंत भोसले यांनी केली.

संत तुकाराम नगर मधील म्हाडाच्या घराच्या प्रमुख मागण्या

1 ) अत्य अल्प उत्पन्न गटातील LIG ची इमारत क्रमांक 197 ते 213 मधील 947 घराणमधील मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्वीकास Redevelopment करणे त्यांना दोन बेडरूम किचन व हॉल असे किमान 1100 स्कवेअर फूट चे घर द्यावे.

2 ) इतर स्कीम मधील स्वतः रहिवाशांनी बांधलेल्या घरांना वाढीब बांधकामांना मान्यता देऊन या घरांवर बँकेचे लोन काढण्यासाठी ना हरकत म्हाडाने द्यावी.

3 ) घराच्या मूळ किमतीवर 2% रक्कम घेऊन रिसेलरचे नावावर घर करून द्यावे.

4 ) गळत असलेल्या म्हाडाच्या इमारती त्वरित दुरुस्त करून द्याव्यात.

5 ) व्यापारी संकुल चे पुनर्वीकास करावा.

6) छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळ्यासाठी महेशनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकशीजारील शिवजयंती साजरा होते त्या स्थळावर करावी.

या सर्व मागण्या सुजाता पलांडे, सुनील पलांडे आणि आमचे सह अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी म्हाडाचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांकडे केली, लवकरच शासनाची मान्यता घेऊन म्हाडा परवानगी देईल अशी घोषणा अध्यक्ष यांनी केली.

वरील महत्वाचे विषय यशवंत भोसले यांनी त्यांच्या प्रस्तावित भाषणात मांडले त्या प्रश्नांबाबत लवकच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आपल्या भाषणात म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील  यांनी दिले.

अमर साबळे यांनी देखील श्रमिकांच्या घरांच्याबाबतीत आलेल्या वरील मागण्या  कार्यक्षम व्यक्तिमत्व असलेले .खासदार व माझे एकेकाळचे संसदेतील सहकारी संसदरत्न व गृहनिर्माण मंडळाचे नूतन अध्यक्ष श्री. शिवाजीरावदादा आढळराव पाटील लवकर पूर्ण करतील असा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी .सदाशिव खाडे, माजी नगरसेवक .बबन गाडवे,ऍड.अतुल गुंजाळ  ,दिपक पाटील,दिनेश  पाटील,राहूल शितोळे,मिलिंद देशपांडे, दत्तात्रय गायकवाड, रामचंद्र देवकर,अमोल घोरपडे, अजय पवार,सुरेश इंगळे, लता पाटील, रिबेका अमोलिक,रजनी  मगर,प्रिया जाधव घोरपडे , मानसी देशपांडे इत्यादी स्थानिक प्रमुख कार्यकर्ते तसेंच सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे सभासद व कामगार प्रतिनिधी देखील या प्रसंगी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

रहिवासी व उद्योजक संघटनेचे अध्यक्ष.जयदेव अक्कलकोटे यांनी सूत्रसंचालन केले, स्थानिक नेते .नंदुअप्पा कदम यांनी आभार मानले.

 

[ad_2]