Skip to content

Sangavi : गणेश मंडळासमोर आरतीच्यावेळी डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती

  • 2 min read

[ad_1]

एमपीसी न्यूज – नवी सांगवी, पिंपळेगुरव मध्ये गणेश मंडळाच्या समोर आरतीच्या वेळी(Sangavi) डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती केली जात आहे.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने नवी सांगवी, पिंपळेगुरव परीसरात डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत संध्याकाळी सात ते नऊ वेळात दररोज चार मंडळामध्ये स्पीकर द्वारे, माहितीपत्रक वाटून डेंग्यू चिकनगुनिया आजाराची जनजागृती करण्यात आली. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि झाल्यावर त्यावरील उपाय योजनांची माहिती शहराध्यक्ष आण्णा जोगदंड हे स्पीकरमधून गणेश भक्तांना देत आहेत,ही जनजागृती अनंत चतुर्थी पर्यंत चालणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

संगिता जोगदंड म्हणाल्या की, डेंग्यू आजार म्हणजे डंक छोटा, धोका मोठा, त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, अंगावर लालसर रंग येणे,तीव्र पाठ दुखी,पुरळ उठणे असे लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे त्यांनी आव्हान केले. प्लास्टिक न वापरण्याची व पर्यावरण रक्षणाची गणेश भक्तांना जोगदंड यांनी यावेळी शपथ दिली. बारामती मित्र मंडळ, मराठा युवा प्रतिष्टान, महाराष्ट्र मित्र मंडळ,सत्ता प्रतिष्टान याठिकाणी जनजागृती घेण्यात आली.

Hinjawadi : जेलमधून सुटलेल्‍या भावाला भेटण्‍यासाठी जाणाऱ्या तरुणावर कोयत्‍याने वार

जनजागृती मोहीमेत शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,गजानन धाराशिवकर,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,शहराध्यक्षा मिना करंजवणे, खेड तालुका अध्यक्ष शंकर नानेकर, काळूराम लांडगे,प्रकाश वीर, बारामती मित्रमंडळाचे संस्थापक सुखदेव चोरमले ,अध्यक्ष सुरेश लोखंडे, संग्राम जगताप, रोहन मेरगळ, महेश आगम, दत्तात्रय घुले,सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकट ,सामाजिक कार्यकर्ते शाम जगताप,मराठा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम कदम, निखिल भोंडवे ,श्रेयस मोरे, राकेश नायडू, महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश साळुंखे, उपाध्यक्ष मनीष भापकर, कार्याध्यक्ष विनायक गारवे, तेजस कुंभार हे मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

[ad_2]