TET : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी 


एमपीसी न्यूज – राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेतली ( TET) जाणार आहे. 

 

इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित/ विनाअनुदानित, कायम अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

Pune : पोलिसांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक 

 

टीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्याची मुदत आहे.

 

10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक या कालावधीत पेपर एक आणि दुपारी दोन ते साडेचार या कालावधीत पेपर दोन ( TET) होणार आहे.