Home Marathi नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

13
0
new business ideas in marathi
new business ideas in marathi

फायदेशीर नवीन व्यवसाय जे सुरुवात करू शकता कमी पैश्या मधे .

नवीन व्यवसाय चालू करायचा आहे पण समजत नाहीय कोणता नवीन व्यवसाय करावा? असे असंख्य प्रश्न नवीन व्यवसाय चालू करण्याअगोदर आपल्या मराठी माणसाच्या मनात पडतात.

मित्रानो नवीन व्यवसाय म्हणजे जस लहान लेकरू जन्माला येत तसच व्यवसायच असत. पहिले १ ते ५ वर्ष लहान लेकरा सारखं सांभाळावं लागत.
जस लहान लेकरू पडत पडत चालायाला शिकत तसच व्यवसायच आहे.

पण आपण लोक नवीन व्यवसाय चालू सुरू करण्याअगोदर त्याचे Swot Analysis करत नाही. आपल्याला नवीन व्यवसाय कल्पना कोन-कोनत्या असु शकतात, हे बघुयात. नवीन व्यवसाय मार्गदर्शन महिती करिता, Humbaa.com/marathi नेहमी भेट द्या.

Also read:

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

Happy Holi 2021 होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

Importance Of Holi In Marathi.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

SWOT Analysis म्हणजे काय ?

SWOT Analysis
SWOT Analysis

SWOT analysis म्हणजे अशे काही टूल, ज्याच्या मदतीने तुम्ही व्यवसाय चालू करण्या अगोदर त्याचं मूल्यमापन करून आपण कोणता व्यवसाय करू शकू हे पाहणे.

S :- strength ( मजबूत बाजू)
तुम्ही नवीन व्यवसाय चालू करत आहत तेव्हा तुम्हाला तुमच्यात कोणती मजबूत बाजू आहे ती ओळखा.
मजबूत बाजू ओळखल्या नंतर तिचा तुमच्या बिझनेस साठी काय उपयोग करता येईल ते पहा.

W : – Weakness( कमकुवत पना )

तुमच्या मधे अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या कुमकुवत आहेत. या गोष्टी व्यवसाय वाढीसाठी अडथळा आणि शकता.

Oppturnity : संधी

यामधे तुमच्याकडे अशी एखादी आयडिया आहे का की समोरच्या प्रतिस्पर्धी पेक्षा जास्त काही करू शकाल,जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसाय साठी उपयोग होईल.

Threat :- धोके

या मधे तुमच्या व्यवसाय साठी कोणत्या गोष्टी आहेत ज्या धोका दायक असू शकता.त्या गोष्टी व्यवसाय वाढीसाठी उपयोग न करणे.

तर मित्रानो आपण वरती Swot Analysis ही संकल्पना समजून घेतली.या संकल्पनेचा तुम्ही व्यवसाय चालू करण्या अगोदर अभ्यास करावा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

आता आपण पाहू की कमी पैसे मधे कोणते नवीन व्यवसाय करता येतील. खाली काही नवीन व्यवसाय चे आयडिया दिल्या आहेत,तुम्ही तुमच्या सवतहाच्या अपेक्षेनुसार आयडिया वापरून व्यवसाय चालू करू शकता.

आपला मराठी माणूस व्यवसाय मधे कमीच आहे का ? कश्यामुळे ?

Why Marathi Peoples, Afraid Of Business
Why Marathi Peoples, Afraid Of Business

त्याच उत्तर व्यवसाय करण्याचं कौशल्य, आयडिया,आराखडा,नियोजन या सर्व गोष्टी.

उदाहरण :

एखादी पाच मजली इमारत जर तुम्हाला बनव्याची असेल तर अगोदर तेथील जागेची माती परिक्षण करावी लागेल. त्यानंतर कळेल नेमक कोणत्या गोष्टी पाया साठी वापराव्या लागतील,जेणेकरून इमारत मजबूत होईल. त्या नंतर इमारत चा नकाशा बनवून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही ती पाच मजली इमारत बनवू शकता. अगदी व्यवसायच तसच आहे.

बिझनेस प्लॅन :

नविन व्यवसाय सुरू करताना त्यामधे कोणत्या गोष्टी हव्या आहेत ,कोणत्या नको याचा आराखडा बनवणे.हे एकदा बनवलं की नंतर तुम्ही त्या त्या नुसार तुमच्या कल्पना व्यवसायात वापरू शकता.

मार्केट रिसर्च: –


तुम्ही व्यवसाय साठी मार्केट मधे जाऊन जो प्रॉडक्ट बनवणार आहात,त्या संबंधी बाजार मधे जाऊन प्रतिस्पर्धी च्या मालाची गुणवतता, किंमत, प्रॉडक्ट मधे त्यांच्या नाविन्य काय आहे.
या सर्व गोष्टी चा रिसर्च मार्केट मध्ये जाऊन करावा.
याचा उपयोग तुम्हाला तुमचं उत्पादन बनवताना समजेल की लोकांना कश्या प्रकारचं उत्पादन हवं आहे आणि आपल्या प्रतिस्पर्धा पेक्षा नवीन काय देता येईल.

व्यवसाय नोंदणी: –

व्यवसायाची नोदणी अवश्य करायला हवी जेणेकरून भविष्यात तुम्हाला सरकार टॅक्स ते भरता येतील,सरकारी योजना चा लाभ घेता येईल.

व्यवसाय नोदणी ३ प्रकारे करू शकता.

१) पार्टनर शिप फर्म :

जर तुम्ही पार्टनर सोबत व्यवसाय चालू करत असाल तर तुम्हाला पार्टनर शिप फर्म म्हणून व्यवसायाची नोंदणी करावी लागेल.

२) वन पर्सन कंपनी :-


नावातच आहे एक माणसाची कंपनी, सवतः चालू करत असाल तर हा पर्याय तुम्ही निवडू शकता.

३) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी :-

जर तुम्ही आणि तुमचे सहकारी मिळून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू करत असाल तर ही नोदणी बंधनकारक आहे.

व्यवसायात नाविन्यता: –

जर तुम्ही रोज एकच भाजी खात राहिलात तर दररोज जेवण करायचं बेचव वाटेल.
हा नियम व्यवसायाला सुद्धा लागू होतोच. तुम्हाला वाटेल कस ?

तर मित्रानो सध्या च युग हे तंत्रज्ञान युग आहे.तुम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन युक्त्या वापरणार नाही तर तुम्ही काहीच करू शकणार नाही.त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी थोडे थोडे नवीन बदल करावेत.

मार्केटिंग : –

इथ मित्रानो तुम्हाला एक सूचित करतो,काही जण म्हणता मी मार्केटिंग करणार नाही. जर तुम्हाला मार्केट मध्ये तुमचं प्रॉडक्ट आणायचं असेल तर मार्केटिंग करावच लागेल अन्यथा ते विकल जाणार नाही.

प्रॉडक्ट तर कुणी पण बनवेल हो, विकता यायला हवं.

ती मराठी मधे म्हण आहे ” जो बोलतो त्याचे लिंब सुद्धा विकतात”.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं तर.

Previous articleसॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.
Next articleVPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.
Ravi is a Professional Blogger since 2009. he has subtle experience in Content writing, A Certified digital marketer; Which Is course held by "Google". He had 4 years Experience In content writing As Well As Search engine Optimisation.