जाणून घ्या गणपतीची पूजा कशी मांडावी ?

गणपतीची पूजा कशी मांडायची

Ganesh Chaturthi 2022 : गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना विशिष्ट पद्धतीने केली जाते. गणेश चतुर्थीला श्री गणेशाची मूर्ती कोणत्या मुहूर्तावर आणि कोणत्या पद्धतीने स्थापन करावी ते जाणून घेऊया.

Ganpati pratisthapana vidhi in marathi – गणपती हा हिंदू धर्मातील प्रसिद्ध देवता असून त्याला बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जातो. संपूर्ण भारतात भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती प्रतिष्ठापना करण्यात येते. विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात गणपतीची मोठ्या उत्साहात पूजा व उत्सव होतात.

Dydd8dI

गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थीची प्रारंभ तारीख: 30 ऑगस्ट, मंगळवार, 03:34 वा
गणेश चतुर्थीची समाप्ती तारीख: 31 ऑगस्ट, बुधवार, दुपारी 03:23 वाजता.
गणपती स्थापनेचा मुहूर्त: 31 ऑगस्ट, बुधवार, सकाळी 11:05 आणि 1 सप्टेंबर, 01:38 पर्यंत सुरू राहील.

fD6wozJ

या पद्धतीने करा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
-गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना नियमानुसार करावी. मूर्ती स्थापनेची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
-प्रथम चौरंगावर पाणी शिंपडा आणि ते शुद्ध करा.

गणेशाची मूर्ती कशी असावी?


मान्यतेनुसार घर आणि मंदिरात गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. ज्या गणेशाची सोंड उजवीकडे वळलेली आहे. त्या मूर्ती सिद्धीपीठाशी संबंधित आहेत. अशी गणरायाची मूर्ती घरात बसवली जात नाही असे मानले जाते. तर दुसरीकडे ज्या मूर्तीमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळलेली असते, ती मूर्ती घरात बसवता येते. गणेशाची मूर्ती घरात बसवल्याने सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

WKgA4lh


-यानंतर चौरंगावर लाल कापड पसरून त्यावर अक्षता ठेवा.
-या चौरंगावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
-आता गणपतीला स्नान घाला किंवा गंगाजल शिंपडा.
-मूर्तीची प्रतिष्ठापना करताना लक्षात ठेवा की मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक एक सुपारी रिद्धी-सिद्धी म्हणून ठेवावी.
-गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवावा.
-हातात अक्षता आणि फुले घेऊन देवाचे ध्यान करावे.
-गणेशाच्या ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.

ck4rDC9

गणेशाची मूर्ती कशी असावी?

9bznq5w


मान्यतेनुसार घर आणि मंदिरात गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. ज्या गणेशाची सोंड उजवीकडे वळलेली आहे. त्या मूर्ती सिद्धीपीठाशी संबंधित आहेत. अशी गणरायाची मूर्ती घरात बसवली जात नाही असे मानले जाते. तर दुसरीकडे ज्या मूर्तीमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळलेली असते, ती मूर्ती घरात बसवता येते. गणेशाची मूर्ती घरात बसवल्याने सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

QPr96DL

भारतीय हिंदू देवता – गणपती माहिती मराठी (ganapati information in marathi)

नावगणपती
इतर नावे1. वक्रतुंड
2. एकदंत
3. कृष्णपिंगाक्ष
4. गजवक्त्र
5. लंबोदर
6. विकट
7. विघ्नराजेंद्र
8. धूम्रवर्ण
9. भालचंद
10. विनायक
11. गणपती
12. गजानन
पालकआई – पार्वती
वडील – शंकर
मंत्रॐ गं गणपतये नमः
तीर्थक्षेत्रेअष्टविनायक
भारतीय हिंदू देवता
eguQDEt

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक. गणांचा अधिपति म्हणून गणपती असे नाव पडले आहे. गणपतीचा उल्लेख अनेक अख्यायिकामध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत पडली.

गणेश चतुर्थी माहिती मराठी (ganesh chaturthi information in marathi)

ganapati pran pratishthapana in marathi – गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ आपण दुकानांतून आणलेल्या गणपतीच्या मूर्तीत जीव ओतणे व आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनविणे.

प्रतिष्ठापणा करताना स्वच्छ कपडे घालून गणपतीच्या मूर्तीला पूर्व किंवा पश्‍चिमेला तोंड करून आसनावर ठेवावी. त्यांनतर स्वतःच्या कपाळावर गंधाचा, कुंकवाचा, शेंदूर, अष्टगंधा यापैकी एकाचा टिळा लावावा.

घरातील देवांच्या मूर्तीला दोन पाने, सुपारी, एक नाणे, विडा व नारळ ठेवून नमस्कार करावा. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन पूजेला बसावे.

गणेश चतुर्थीला सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद असतात कारण या दिवशी गणपती स्थानापन्न होतात. गणेश चतुर्थी हा संपूर्ण भारतात साजरा होणारा मुख्य सण आहे. हा Ganesh Chaturthi 2022 उत्सव दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानच्या इंग्रजी दिनदर्शिकेनुसार आयोजित केला जातो, तर हिंदू दिनदर्शिकेनुसार हा उत्सव भाद्रपद महिन्यात येतो. हा सण 10 दिवसाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव गणेश चतुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. Ganesh Chaturthi 2022

गणपतीची पूजा कशी मांडावी (ganesh chaturthi puja vidhi marathi)

दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृताने मूर्तीला स्नान घालावे. यानंतर मूर्तीवर नवीन वस्त्र व जानवे घालून सुवासिक अत्तर लावावे. मूर्तीवर गुलाबपाणी शिंपडावे. तसेच चाफा, गुलाब, सोनटक्का, जाई-जुई, केवडा अशी फुले मूर्तीला वाहाव्यात.

स्वच्छ पळी-भांड्यातील पाणी तीन वेळा पोटात घेऊन चौथ्या वेळी हातावर सोडून उष्टा हात स्वच्छ करावा. यानंतर प्राणायाम, गायत्री जपासह आपल्या उजव्या बाजूला मांडलेल्या गणपतीवर अक्षता व फुले वाहावीत.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः ।

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

अशी प्रार्थना म्हणावी. मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे, असा संकल्प करून पुढील मंत्र उच्चारण करावे.

आरोग्यं धनसंपदाम्‌।

शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते।।

यानंतर घंटेला गंध, फुले, अक्षता वाहावी. गणेशोत्सवात सज्जन लोक यावेत, राक्षसी वृत्तीचे, दुष्ट, गुंड पळून दूर जावेत यासाठी घंटा जोरात वाजवीत पुढील प्रार्थना करावी.

आगमार्थं तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम्‌।

कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणम्‌।।

यानंतरचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणे. ॐ गं । गणपतये नमः । हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे. मूर्तीच्या छातीच्या मध्यभागी उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेशमूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत, अशी प्रार्थना करावी.

यावेळी कमीतकमी 15 वेळा “ॐ’काराचा जप करावा. श्री मंगलमूर्तीची सर्व कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये जिवंत व्हावीत, त्यांची वाणी, मन, त्वचा, नेत्र सचेतन क्रियाशील व्हावीत, अशी प्रार्थना करावी.

यानंतर मूर्तीवर गंध, अक्षता, फुले वाहून गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा, नारळ यांच्यावर पाणी टाका. अश्या प्रकारे गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल.

गणपती केव्हा बसणार आहेत (ganesh chaturthi muhurat 2022 marathi)

2022 या वर्षी गणपती 31 ऑगस्ट रोजी बसणार आहेत. म्हणजेच य दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11:05 ते दुपारी 01:38 या वेळेत श्रीगणेशाची पूजा करण्याचा मुहूर्त आहे. त्यामुळे याच वेळेत गणपतीची यावेळी विधिपूर्वक पूजा करून मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

गणपतीची आरती मराठी (ganpati aarti marathi – sukh karta dukh harta aarti lyrics marathi)

सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची |

सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची, कंठी झलकेमाळ मुक्ता फळांची ||

जय देव जय देव, जय मंगल मूर्ति दर्शन
मात्रे मनःकमाना पूर्ति 
जय देव जय देव ||

रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा |

हीरे जडित मुकुट शोभतो बरा, 
रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया ||

जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव||

लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना
सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना |

दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ||

जय देव जय देव, जय मंगल मूर्तिदर्शनमात्रे मनःकमाना पूर्तिजय देव जय देव||

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुख को
दोन्दिल लाल बिराजे सूत गौरिहर को |

हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को
महिमा कहे ना जाय लागत हूँ पद को ||

जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव||

अष्ट सिधि दासी संकट को बैरी
विघन विनाशन मंगल मूरत अधिकारी |

कोटि सूरज प्रकाश ऐसे छबी तेरी
गंडस्थल मद्मस्तक झूल शशि बहरी ||

जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव ||

भावभगत से कोई शरणागत आवे
संतति संपत्ति सबही भरपूर पावे |

ऐसे तुम महाराज मोको अति भावे
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ||

जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव ||

गणपती विसर्जन कसे करावे (ganpati visarjan 2022 marathi)

सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची पूजा करावी. गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य अर्पण करावा. गणपतीला नवीन वस्त्रे परिधान करावीत. एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात.

विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा. गणेशोत्सव काळात चुकून झालेल्या चुकांबद्दल गणेशकडे क्षमायाचना करावी. गणपतीच्या मूर्तीसोबत पूजा साहित्य व इतर वस्तू विसर्जित कराव्यात.

यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।

इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।

गणपतीची आरती झाल्यावर वरील असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी. मग मूर्ती उचलून योग्य त्या पवित्र ठिकाणी विसर्जित करावी.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये गणेश चतुर्थी माहिती मराठी (ganesh chaturthi information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

गणेश चतुर्थी केव्हा साजरी करतात ?

गणेश चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला साजरी करतात. कारण याच दिवशी गणपतीच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म झाला होता.

गणेश चतुर्थी का साजरी करतात ?

गणपतीच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला होता. या दिवशी गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी व शांती प्रस्थापित होते, अशी मान्यता असल्याने गणेश चतुर्थी साजरी करतात.

पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कधी साजरा केला ?

इसवी सन 1894 साली लोकमान्य टिळक यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव विंचूरकर वाड्यात साजरा केला.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात Ganesh Chaturthi 2022

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ती १८९४ साली केली. Ganesh Chaturthi भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा अगदी योग्य वापर केला. गणेशोत्सव व शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.