How to overcome depression in Marathi

आपल्या भारताची एक खासियत आहे. एखादी वाईट घटना घडल्यानंतरच त्यावर उपाय व विचारविनियम सुरू होतात. पण त्या आधी सतर्कता बाळगली जात नाही. काल- पर्वाची गोष्ट ध्या ना बॉलीवुड स्टार सुशांत सिंह सरांची आत्महत्या हे खरं तर नैराश्या- मुळे, मानसिक तणावामुळे घेतलेले पाऊल आहे.नैराश्य हा सुद्धा एक आजार आहे. हे आजच्या काळाला मानावेच लागेल.

आजपर्यंत देशात कित्येक शेतकयांनी आत्महत्या केल्या आहेत याच नैराश्यातून, पण प्रसिद्धी आलेल्या व चर्चेत असलेल्या व्यक्तीला नैराश्यातून जेव्हा आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागते त्या वेळेस सर्वांचे या गंभीर आजार याकडे लक्ष जाते !!! नैराश्य म्हणजे मनाचे खच्चीकरण होय.

माणूस वरून हसत देखील असेल, पण; आतून तो कित्येक समस्या यांनी ग्रासलेला आहे. हे कळत देखील नाही मानसिक तणाव हा कित्येक कारणांमुळे येऊ शकतो. 

Also Read:

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

Join Our Humbaa Marathi Whats App Group

डिप्रेशन संपवायचे ५ नैसर्गिक अगदी सोपे उपाय | HOW TO OVERCOME DEPRESSION NATURALLY IN MARATHI

कधी कधी आपण त्या गोष्टींचा अंदाजा सुुद्धा लावू शकत नाही. अनेकांनी या घटनेनंतर सोशल मिडीयावर काही पोस्ट टाकल्या जसे की जवळच्या माणसाला समजून घ्या, अशा काळात  दुःख व्यक्त करण्यास खांदा दया वगेरे, वैगेरे.

पण खरंच आपण तस करतो का?? खूप मोठं आहे हे प्रश्नचिन्ह, जग इतके स्वार्थी झाले आहे कि इथे माणुसकी जिव्हाळा, आपुलकी यावर ठाण मांडून बसलेले आहे, माणसाचे स्वार्थी मन !!

आजच्या काळात माणूस गरजेनुसार माणूस जोडतो. त्यामुळे अशा धावपळीच्या युगात दुसर्यांचे मन जाणून घेण्यास कुणालाच इच्छा देखील राहिली नाही. माणूस स्वतःच्या जगात इतका व्यस्त आहे कि विसरून गेला कि “मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे.”

नैराश्याचे सर्वात मोठ कारण म्हणजे अपयश! मग ते कोणत्याही गोष्टीत असो. घाटातून जाताना सतत वळणं येत राहतात. डावीकडे वळत असताना उजवीकडे वळण दिसत नाही.

आयुष्यातही असचं असते काही नको असलेली वेळणे देखील ठाण मांडून पुढ्यात बसतात.

पण ती ही वळणे गरजेची असतात, एक माणूस म्हणून जगताना खरंतर आजच्या काळाची गरज आहे कि नेमक यश म्हणजे काय ???

हे भावी पिढीला पटवून देणे. यशाची व्याख्या ही प्रत्येक माणसावर अवलंबून असते. आजच्या

काळात भरपूर पैसा जमीन-जुमला। बंगला-गड प्रसिद्धी, चारचौघात नाव असणे म्हणजे यश होय 

खरंच ही  आहे का यशाची व्याख्या??

मग तस म्हटलं तर सुशांत सरांना काय कमी होते? पैसा प्रसिद्धी बंगला गाडी सेलिब्रिटी सुद्धा

होते ते!!! 

या सर्व गोष्टी यशाच्या व्याख्येच्या दुय्यम स्थानांवर येतात, माझ्या मते, जीवन किंवा आयुष्य नावाच्या सागरावर प्रवास करत असताना विविध कौशल्य क्षमता विकसित करणे,  हे खरं यश आहे.

अपयशावर मात करून आपला विश्वास म्हणजेच आत्मविश्वास टिकवून ठेवणे. हे खरं यश

आहे. आजचा माणूस दुसऱ्यांच्या चुका काढून खर किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यातच मग्न आहे.  मग आजचा माणूस कसा देणार वेळ दुसयांना नैराश्यातून बाहेर पडव्यासाठी ???

मानसातील माणूस जागा ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. Homo sapiens sapiens हि सर्वात सुधारित मानवजाती आहे.  पण आपले वर्तन सुधारित आहे का ???

कधीच आपल्या जवळच्या माणसांना दुखवू नका उलट आहे तेच दुःख, वाटून घ्या,त्यांच ओझं कमी करा- बाकीची ची सर्व मदत बाजूला ठेवा. फक्त माणूस म्हणून मानसिक आधार दिला तरी खूप आहे.

शेवटी माणूसच माणसांच्या भावना समजून घेणार ना,  एखादा माणुस काहीतरी वेगळ करण्याचा 

प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन दया, त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करू नका. आपण जर

योग्य मार्गावर, योग्य कृतीवर, योग्य विचारांवर ठाम असूं ना , त्यावेळेस आपल्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकणार नाही, आजच्या भावी+ पिढीला संयमाने  काम करणे गरजेचे आहे.  यश हा आयुष्यातला एक टप्पा आहे अंतिम उद्दिष्ट नाही. मग त्याने

चढ -उतार तर होनारच .यश हे कायमस्वरूपी टिकून राहणे हे अशक्य आहे. कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागत आजच्या समाजाच्या विचारशैली मुळे तसेच लोक काय म्हणतील या भीतीने माणूस आतल्या आत घुसमटत जातो. लोक काय म्हणतील? हा पण विचार आपणच केला तर लोक काय करतील.

लोकांना जे बोलायचे आहे ते बोल्क दया आपण आपले कार्य मनापासून करत रहायचे. 

हिंदी मध्ये एक म्हण आहे ना; “सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग।” वेळ आली की लोक आपले तोंड आपोआप बंद करतात. माणसाला मनमोकळेपणाने व्यक्त होता येत नाही आणि व्यक्त व्हावे तरी कोणाजवळ ? हा मोठा प्रश्नः ,

कारण लोक ऐकून घेताना हळहळ व्यक्त करतात पण तीच गोष्ट इतरांना हसून सांगतात. पण काही लोक

पण काही लोक खरच सर्व ऐकूनही घेतात आणि  योग्य मार्ग ही दाखवतात. 

प्रत्येकाच्या आयुष्यात असावा असा एखादा Mentor (गुरू) हीच ईंश्वर चरणी प्रार्थना.

तुम्हाला माझे लिखाण कसे वाटले, याबाबद्दल नक्की खाली कमेंट करा, आमच्या व्हाट्स अँप आणि टेलिग्राम ग्रुप ला subscribe करा.

Categorized in: